घरदेश-विदेशतळीरामानं घेतली ५२ हजारांची दारू; मात्र गुन्हा दाखल झाला विक्रेत्यावर!

तळीरामानं घेतली ५२ हजारांची दारू; मात्र गुन्हा दाखल झाला विक्रेत्यावर!

Subscribe

त्या व्यक्तीने आपली ५२ हजार ८४१ रूपयांची पावती सोशल मीडियावर टाकली आणि क्षणार्धात ती व्हायरल झाली

तुम्ही ५२ हजार ८४१ रुपये किंमतीची दारू खरेदीची पावती पाहिली आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पावतीने कर्नाटक सरकारला हादरवून टाकले आहे. यामुळे बंगळुरूच्या उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तर बंगळुरूमधील व्हॅनिला स्पिरिट झोन या दुकानमालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशातील बर्‍याच राज्यांत आज दारू विक्रीचा दुसरा दिवस असून लोक रांगेत दारू खरेदी करताना पाहिला मिळाले. तर अनेक राज्यांनी या दारू खरेदीचे प्रमाणही निश्चित केले आहे, त्याअंतर्गत लोकांना दारू दिली जात आहे. कर्नाटक सरकारनेही हे प्रमाण निश्चित केले होते, परंतु सरकारच्या या आदेशाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात असून ५२ हजार ८४१ रुपये किंमतीची दारू खरेदीची पावती देखील व्हायरल केली जात आहे.

- Advertisement -

काल एका व्यक्तीने व्हॅनिला स्पिरिट झोन या दुकानामधून ५२ हजार ८४१ रुपयांची दारू खरेदी केली. त्या व्यक्तीने आपली पावती सोशल मीडियावर टाकली आणि क्षणार्धात ती व्हायरल झाली. यानंतर बंगळुरूच्या उत्पादन शुल्क विभाग कारवाईत हा विक्रेता सापडला आणि एका व्यक्तीला निर्धारित प्रमाणा पेक्षा जास्त दारू देण्याच्या प्रकरणात त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दुकानदाराने असे सांगितले की,  ५२ हजार ८४१ रुपयांची दारू एकाच व्यक्तीने खरेदी केली नसून ८ व्यक्तीनी या किंमतीची दारू खरेदी करून त्याचे पैसे एकाच कार्डने केले आणि त्यामुळे त्यांचे बिल ५२ हजार ८४१ रूपयांचे केले. कर्नाटकच्या उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांनुसार एखाद्या व्यक्तीला फक्त २. ६ लिटर दारू विकली जाऊ शकते. यापेक्षा जास्त दारू विकल्यास त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते.


गर्दी करु नका रे.. मद्य विकत घेण्यासाठी आता टोकन मिळणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -