घरदेश-विदेशखोटं बोलण्याच्या स्पर्धेत पंतप्रधान मोदींना हरवू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल

खोटं बोलण्याच्या स्पर्धेत पंतप्रधान मोदींना हरवू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल

Subscribe

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांना आता वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी हे देखील प्रचारात उतरले आहे. राहुल गांधींची पाटणा येथे प्रचारसभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी करू शकत नाही. आम्हाला ती गोष्ट जमत नाही, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

आजपर्यंत काँग्रेसने देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. काँग्रेसच्या काळात ‘मनरेगा’सारखी योजना सुरु झाली, आम्ही शेतकऱ्यांची कर्जे माफ केली. शेतकऱ्यांच्या पाठिशी कसं उभं राहायचं?, रोजगारनिर्मिती कशी करायची आणि देश कसा चालवायचा हे काँग्रेसला ठाऊक असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारसभा बुधवारी वाल्मिकीनगर येथे पार पडली.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी प्रचार सभेत केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला २ कोटी रोजगार देणार, असं आश्वासन देणार नाहीत. आपण खोटं बोलतोय ही गोष्ट लोकांच्या लक्षात आल्याचं त्यांना समजलं आहे. त्यामुळे आता बिहारमधील सभांमध्ये ते २ कोटी रोजगारांचे आश्वासन देणार नाहीत, असा घणाघात केला. काँग्रेसला अशाप्रकारे खोटं बोलायला जमत नाही. खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बरोबरी करू शकत नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -