घरदेश-विदेशBihar Election 2020 : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान; १०६६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Bihar Election 2020 : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान; १०६६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Subscribe

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात आज, बुधवारी एकूण ७१ जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. हे मतदान सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान, ४ जागांसाठी दुपारी ३ वाजेपर्यंत, २६ जागांसाठी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आणि ५ जागांसाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १०६६ उमेदवारांचा निर्णय मतदार मतपेटीत कैद करणार आहेत. यामध्ये ११४ महिलांचा समावेश आहे. तर २ कोटी १४ लाखांहून अधिक मतदार या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बिहार निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात ३१ हजार ३७१ मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे.

पहिल्या टप्प्यातील पक्षीय उमेदवार –

  • आरजेडी – ४२
  • जदयू – ३५
  • भाजप – २९
  • काँग्रेस – २१
  • भाकप – ८
  • हिंदुस्तान अवाम मोर्चा – ६
  • विकासशील इंसान पार्टी – १
  • एलजेपी – ४१
  • आरएलएसपी – ४०
  • बीएसपी – २६
  • एनसीपी – २१

पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्याव्यतिरिक्त आठ मंत्री प्रेम कुमार, कृष्णनंदन वर्मा, शैलेश कुमार, विजय कुमार सिन्हा, जय कुमार सिंह, रामनारायण मंडल, संतोष कुमार निराला आणि बृजकिशोर बिंद यांच्यासह अनेक दिग्गज निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. तसेच वयोवृद्ध मतदारांसाठी आपलं मत नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सॅनिटाइज करणं, मतदारांसाठी मास्क आणि सुरक्षेविषयक साहित्य आणि थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर, साबण आणि पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

भाजपशी लागेबांधे असल्याचा आरोप असणाऱ्या Facebook इंडियाच्या अंखी दास यांचा राजीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -