घरदेश-विदेशलग्न करण्यासाठी मुलाचे अपहरण

लग्न करण्यासाठी मुलाचे अपहरण

Subscribe

मुलाचे अपहरण करुन बंदूकीच्या धाकावर लग्न करण्याचा प्रयत्न करण्याची घटना समोर आली आहे. बंदूकीचा धाकदाखवत ३० वर्षीय अभियंत्याचे अपहरण करण्यात आले. दुर्गा शरन असे पीडित इसमाचे नाव आहे. वैशाली जिल्ह्यातील समस्तीपूर येथीस जंधाहा पोलीस ठण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मुलीच्या घरच्यांनी या मुलाचे लग्न लावून देण्यासाठी अपहरण केले. अपहरणाची माहिती दुर्गा शरनच्या आई वीना देवी ला फोनवरुन देण्यात आली. माहितीमिळातच तिने पोलीस ठाण्यात जाऊन अपहरण कर्त्यांविरोधात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ वर्षीय तरुणीशी लग्न करण्यासाठी मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. याच परिसरात राहणारे अरविंद राय यांची मुलगी प्रियांका कुमारी बरोबर लग्न करण्यासाठी बंदूकीचा धाक दाखवत या मुलाचे अपहरण करण्यात आले. नवरीच्या घरच्या सहा जणांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. यामध्ये नवरीचे पिता अरविंद यांचे ही नाव सामिल आहे.

- Advertisement -

मुलीने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षभर तिचे शरन सोबत प्रेमसंबध होते. शरनने लग्नकरण्यासाठी हूंड्याची मागणी केली होती. हूंड्यास नकार दिल्यामुळे मागील काही दिवासांपासून शरन तिच्याकडे काना डोळा करत होता. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी त्याचे अपहरण केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -