घरदेश-विदेशमोदींना बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मोदींना बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Subscribe

पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'स्वच्छ भारत अभियान' सुरू करणाऱ्या योगदानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव केला जाणार आहे.

२०१८ मधील ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी कौतुक केलं होतं. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करणाऱ्या योगदानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव केला जाणार आहे. यापूर्वी सहा मुस्लिम राष्ट्रांनी आणि रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना गौरविले आहे. सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशकडून त्यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती दिली. या अभियानाच्या मार्फत देशात ८ कोटींहून अधिक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी यांसदर्भात टि्वट केलं आहे. या टि्वटद्वारे त्यांनी सर्व माहिती दिली आहे. ‘अजून एक पुरस्कार. आणखी एक क्षण प्रत्येक भारतीयांसाठी. कारण, जगभरात पंतप्रधान मोदींची प्रगतशील धोरण आणि मेहनतीची प्रशंसा केली जात आहे. पंतप्रधानाचा अमेरिका दौऱ्यादरम्यान ऑक्टोबर महिन्यात बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून गौरव केला जाणार आहे,’ अशी माहिती राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -