घरताज्या घडामोडीBipin Rawat Chopper Crash: CDS... मी..... बिपीन रावत यांचे शेवटचे शब्द, बचावकर्त्याने...

Bipin Rawat Chopper Crash: CDS… मी….. बिपीन रावत यांचे शेवटचे शब्द, बचावकर्त्याने सांगितला घटनाक्रम

Subscribe

तामिळनाडूच्या कुन्नूरमधील निलगिरीच्या जंगलात तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यावर घटनास्थळावरुन दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले होते. बचावकार्यादरम्यान सीडीएस बिपीन रावत आणि आणखी एका अधिकाऱ्याला जखमी अवस्थेत वाचवण्यात आले होते. यावेळी बिपीन रावत शुद्धीत होते आणि त्यांनी आपले नावही सांगितले असल्याची माहिती बचावकर्त्याने दिली आहे.

भारतीय सुरक्षा दलाचे एमआई १७ वी ५ या सुसज्ज हेलीकॉप्टरचा तामिळनाडुमध्ये अपघात झाला. यामध्ये देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत त्यांच्या पत्नी आणि अधिकाऱ्यांसह प्रवास करत होते. निलगिरीच्या जंगलात हेलीकॉप्टरचा अपघात झाला याची माहिती बचाव दलाला देण्यात आली. बचाव दलातील एका सदस्याशी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरुन दोघांना जिवंत वाचवण्यात आले होते. यामध्ये जनरल बिपीन रावत यांचा समावेश होते. रावत यांनी हिंदीमध्ये छोट्या आवाजात आपले नाव सांगितले. मी जनरल बिपीन रावत… असं रावत यांनी जखमी अवस्थेत म्हटलं असल्याचे बचाव दलाच्या सदस्याने सांगितले. यानंतर रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु शरीराच्या खालच्या भागाला गंभीर जखम झाल्यामुळे रावत यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

बचावकार्यात सहभागी असलेल्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार जनरल बिपीन रावत यांच्या शरीराचा खालचा भाग जळाला होता. त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. यामुळे रावत यांना बेडशीटमधून रुग्णवाहिकेत नेण्यात आले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच रावत यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. एस पलनीसामी म्हणाले की, हेलीकॉप्टरच्या अपघात झाल्यानंतर सर्व अधिकारी आणि पायलटचे मृतदेह मलब्याखाली दबले होते. आगीवर नियंत्रण मिळवणेही कठीण झाले होते.


हेही वाचा : History of Air Crashes in India: ‘या’ राजकीय नेत्यांचा झालाय विमान आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

हेही वाचा : DS Bipin Rawat : सीडीएस बिपीन रावत यांच्या मुली आहेत तरी कोण? पाहा फॅमिली फोटो


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -