घरदेश-विदेशभाजपमध्ये ज्येष्ठांना मान नाही

भाजपमध्ये ज्येष्ठांना मान नाही

Subscribe

भारतीय जनता पक्षाला शुन्यापासून घडवणार्‍या ज्येष्ठांना त्या पक्षात मान राहिला नसल्याचं एव्हाना स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यावर शिक्कामोर्तब झालं. पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबरच मुरलीमनोहर जोशी यांचा उमेदवारीचा पत्ता परस्पर कापण्यात आल्यावर आता लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वत:च पक्षाध्यक्ष अमित शहा यांना पत्र पाठवून निवडणूक लढवणार नसल्याचं सांगून टाकलं. महाजन यांचे हे पत्र म्हणजे पक्ष नेतृत्वाकडे दिलेला नाराजी नामाच असल्याची चर्चा भाजपत सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पक्षाच्या पहिल्या यादीतून लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावं काढण्यात आल्याचं स्पष्ट होताच पक्ष नेतृत्वार जोरदार टीका होऊ लागली होती. पक्षाला शुन्यातून बाहेर काढणार्‍या नेत्यांची पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अवस्थेवर जोरदार कोरडं ओढलं जात होतं.

- Advertisement -

हे होत असतानाच अडवाणी यांनी पक्षाच्या विरोधकांवर टीकेची झोड उठवण्याच्या नीतीवर जोरदार टीकास्त्र सोडलं. आपल्या ब्लॉगवर अडवाणी यांनी विरोधकांनी टीका करणं म्हणजे त्यांना देशद्रोही कधी मानलं नाही, असं म्हणत पक्ष नेतृत्वाला खडे बोल सुनावले. नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट , सेल्फ लास्ट असं म्हणत अडवाणी यांनी देशापेक्षा कोणीही मोठा नाही, असं जाहीर करत मोदींच्या एकूणच देहबोलीचा समाचार घेतला.

अडवाणी यांच्या ब्लॉगवरील स्पष्टीकरणानंतर काल लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही पक्षाप्रति नाराजी व्यक्त करत आपण निवडणूकच लढवू इच्छित नसल्याचं सांगितलं. मध्यप्रदेशच्या इंदूरमधून सुमित्रा महाजन या गेल्या १० टर्म निवडून येत आहेत. त्यांनी पक्षप्रमुखांना पत्र पाठवून इंदूरमध्ये उमेदवार निवडण्यात पक्षाला आपल्यामुळे संकोच वाटत असल्याचे स्पष्ट करत आपल्याला उमेदवारी देण्यात होत असलेल्या चालढकलीवर त्यांनी कोरडं ओढलं. पण आता मलाच निवडणूक लढवयची नाही, असं त्यांनी पाठवलेल्या पत्रात स्पष्ट करून टाकलं. महाजन यांच्या या पत्राने त्यांच्यातील नाराजी उघड बाहेर आली आहे. अध्यक्षपदावरील व्यक्तीसाठी राजकीय स्पर्धांबाबत लवचिक भूमिक घ्यावी, अशी अपेक्षा असताना पक्षाने मात्र त्यांच्या पत्रावर मौन भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

अडवाणी यांच्या ब्लॉगवरील वक्तव्यानंतर मोदी यांनी रिट्विट करत अडवाणी योग्यच बोलत असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना देशद्रोहात मोजणं हे लोकशाहीत न बसणारं आहे. त्यांना विरोधक म्हणून मान दिलाच पाहिजे, या अडवाणींच्या मताशी आपण पूर्णत: सहमत असल्याचं मोदी म्हणाले. ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना उमेदवारी द्यायची नाही, असा निर्णय याआधीच घेण्यात आला होता, असंही मोदी म्हणाले.

गुरू परंपरा मोडीत
अडवाणींसारख्या गुरूला अपमानित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू धर्मात सर्वोच्च समजल्या जाणार्‍या गुरू परंपरेला मोडीत काढले असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ते चंद्रपूरमध्ये जाहीर सभेत बोलत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -