घरदेश-विदेश'तारुण्यात आलेल्या प्रत्येकाला ऐश्वर्या हवी असते'; भाजप मंत्र्याचं अजब वक्तव्य

‘तारुण्यात आलेल्या प्रत्येकाला ऐश्वर्या हवी असते’; भाजप मंत्र्याचं अजब वक्तव्य

Subscribe

‘तारुण्यात आलेल्या प्रत्येकाला ऐश्वर्या राय हवी असते. मात्र, ऐश्वर्या एकच आहे. तसंच उपमुख्यमंत्रिपदाबाबत आहे. प्रत्येकजण महत्त्वकांक्षी असला तरी प्रत्येकाला उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकत नाही’, असं कर्नाटकचे भाजपमंत्री के. एस. ईश्वरप्पा म्हणाले आहेत. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात १५ मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली होती. उद्या या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपला कर्नाटकात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी सहा आमदारांची गरज आहे. दरम्यान, निवडणूक निकालाआधीच भाजपमध्ये उपमुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे समोर येत आहे. याबाबत के. एस. ईश्वरप्पा यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तुलना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यासोबत केली.


हेही वाचा – महाविकास आघाडीत धूसफूस सुरु? अशोक चव्हाण यांचं सूचक वक्तव्य

- Advertisement -

कर्नाटक सरकारमधील ग्रामीण विकास आणि पंचायत राज्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तुलना बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यासोबत केली. ‘उपमुख्यमंत्रीपद कुणाला नको? सत्तेची ताकद प्रत्येकाला हवी असते. तारुण्यात आलेल्या प्रत्येकाला ऐश्वर्या रायशी लग्न करावसं वाटतं. पण ऐश्वर्या तर एकच आहे ना! महत्त्वकांक्षा असली तरी प्रत्येकाला उपमुख्यमंत्री केलं जाऊ शकत नाही’, असे ईश्वरप्पा म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे.


हेही वाचा – आम्ही राष्ट्रवादीकडे गेलोच नव्हतो, पवारच आले आमच्याकडे – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वी दोन महिन्यांअगोदर कर्नाटक राज्यात मोठा राजकीय भूकंप आला होता. कर्नाटकमध्ये भाजप पक्षाने सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएसच्या १७ आमदारांना फोडले होते. या सर्व आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर बरेच राजकीय नाट्य बघायला मिळाले. दरम्यान, भाजपने सत्ताधारी काँग्रेस आणि जेडीएस सरकारला विधानसभेत विश्वासाचा ठराव सिद्ध करण्याचे आवाहन केले. विश्वासाच्या ठरावाच्या वेळी बंडखोर १७ आमदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे कुमारस्वामी सरकार कोसळले. त्यानंतर कर्नाटकात भाजप सत्तेत आली. मात्र, बंड पुकारलेल्या त्या १७ आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले. त्यामुळे कर्नाटकात १५ मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -