घरदेश-विदेश'भारतात असुरक्षित वाटणाऱ्यांना बॉम्बने उडवून द्या'

‘भारतात असुरक्षित वाटणाऱ्यांना बॉम्बने उडवून द्या’

Subscribe

माझ्याकडे जर एखादं मंत्रालय दिल्यास अशा सर्वच व्यक्तींना मी बॉम्बनं उडवून देईन. कोणालाही सोडणार नाही. त्यांनी पुढे असे आमदार सैनी यांनी म्हटलं आहे.

उत्तरप्रदेशच्या भाजप आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारतात ज्यांना असुरक्षित वाटतं त्यांना बॉम्बने उडवून दिलं पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार विक्रम सैनी यांनी केले आहे. विक्रम सौनी हे मुझफ्फरनगरच्या खतौलीचे आमदार आहेत. हे वक्तव्य करत असताना हे माझे वयक्तिक मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यांनी असं म्हटले आहे की, मला असे वाटते की, भारतात आपल्याला असुरक्षित वाटतं असं म्हणणारी व्यक्ती देशद्रोही असून त्याला बॉम्बने उडवून दिले पाहिजे. तसंच असुरक्षित म्हणणाऱ्या अशा लोकांना त्यांनी देश सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी अभिनेता नसरुद्दीन शहा यांनी काही दिवसांपूर्वी भारतात रहायला भीती वाटते असं म्हटलं होतं. आमदार विक्रम सैनी यांनी केलेलं वक्तव्य नसरुद्दीन शहा यांनी केलेल्या विधानावरील प्रतिक्रिया असल्याचं सांगितले जात आहे.

- Advertisement -

बॉम्बने उडवून द्या

आमदार विक्रम सैनी यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, जे देशद्रोही असून असे म्हणतात की आमच्या जीवाला धोका आहे आणि आम्ही असुरक्षित आहोत. अशाची काही तरी सोय झाली पाहिजे. जे असे बोलतात त्यांना शिक्षा व्हावी आणि त्यांना देशद्रोहीच्या श्रेणीमध्ये टाकावे. माझ्याकडे जर एखादं मंत्रालय दिल्यास अशा सर्वच व्यक्तींना मी बॉम्बनं उडवून देईन. कोणालाही सोडणार नाही. त्यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, लष्कराकडे खूप बॉम्ब आहेत.

भीती वाटते तर देश सोडावा

भाजप आमदार सैनी यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यावर काहीच वाटत नाही. त्यांनी असं ही म्हटले आहे की, हा माझा वैयक्तिक विचार आहे आणि आमच्या गावची भाषा अशीच आहे. बॉम्ब फोडण्याची माझी रोजचीच भाषा आहे, माझ्या गावची अशीच भाषा आहे. ही माझी भावना आहे मला संधी तर मिळू द्या असं त्यांनी म्हटले आहे. त्यांनी असे ही सांगितले आहे की, ज्यांना भारतात भीती वाटते त्यांनी देश सोडून जावे. आमदार असे वादग्रस्त वक्तव्य करत असताना त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या लोकांनी घोषणा देखील केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -