घरमहाराष्ट्रराज ठाकरे 'बोलघेवडा पोपट'; भाजपची व्यंगचित्रातून टीका

राज ठाकरे ‘बोलघेवडा पोपट’; भाजपची व्यंगचित्रातून टीका

Subscribe

भाजपच्या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरे शरद पवार यांना प्रश्न विचारत आहे की, 'साहेब काय विचारु? यावर पाळीव पत्रकारांनी सेट करुन दिलेले मोदी विरोधी प्रश्न विचारा, उत्तरं तयार आहेत', असे पवार सांगत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व्यंगचित्रांवरुन रणकंदन माजले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यंगचित्राला आता भाजपने व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी भाजपने राज ठाकरे यांना बोलघेवडा पोपट म्हटले आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. याच मुलाखतीचा संदर्भ घेत भाजपने राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. भाजपने हे व्यंगचित्र स्वत: च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी राज ठाकरेंना ‘बोलघेवडा पोपट’ म्हटले आहे.

हेही वाचा – मोदींची ती मुलाखत ‘मॅनेज’; राज ठाकरेंची व्यंगचित्रातून टीका

- Advertisement -

‘क्रोध मोदींचा यशाचा’

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्याच मुलाखतीचा संदर्भ घेत भाजपने आपल्या व्यंगचित्रात ‘क्रोध मोदींच्या यशाचा’ अशा मथळ्याखाली व्यंगचित्र काढलं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात मोदींच्या मुलाखतीला ‘एक मनमोकळी मुलाखत’ म्हटले होते. याउलट भाजपने आपल्या व्यंगचित्रात ‘एक सेटींगवाली मुलाखत’ असे म्हटले आहे. भाजपच्या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरे शरद पवार यांना प्रश्न विचारत आहे की, ‘साहेब काय विचारु? यावर पाळीव पत्रकारांनी सेट करुन दिलेले मोदी विरोधी प्रश्न विचारा, उत्तरं तयार आहेत’, असे पवार सांगत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर एका कोपऱ्यात राज ठाकरे यांची ‘बोलघेवडा पोपट’ म्हणून खिल्ली उडवण्यात आली आहे. तर दुसऱ्या कोपऱ्यात मनसेचे इंजिन खाली कोसळत असल्याचा व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘राज ठाकरेंनी आता चला हवा येऊ द्या पाहावं’!

- Advertisement -


हेही वाचा – मनसेचा भाजपला टोला; ‘तुमची हवा बदलते हे लक्षात घ्या’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -