घरदेश-विदेशपत्नी TMC मध्ये गेली म्हणून भाजप खासदाराचा संताप; पाठवणार घटस्फोटाची नोटीस

पत्नी TMC मध्ये गेली म्हणून भाजप खासदाराचा संताप; पाठवणार घटस्फोटाची नोटीस

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले आहे. तृणमूल कॉंग्रेस (TMC) चे अनेक नेते भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, आता भाजपमधून तृणमुल कांग्रेसमध्ये नेते जात आहेत. याची सुरुवात भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता यांच्यापासून झाली. सुजाता यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये सोमवारी प्रवेश केला. यानंतर भाजप खासदार सौमित्र खान यांनी पत्नीला घटस्फोट घेण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, आता पश्चिम बंगालच्या राजकारणामुळे आता गृह कलह देखील सुरु झाले आहेत.

सुजाता मंडल यांनी कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पक्षप्रवेश केला. यानंतर त्यांचे पती भाजप खासदार सौमित्र खान यांना राग अनावर झाला आहे. त्यांनी घटस्फोटाची नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले आहे. यावर सुजाता मंडल म्हणाल्या की, “कुटुंब आणि राजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता पुढे काय करायचे आहे याचा निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल.”

- Advertisement -

टीएमसीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सुजाता खान यांनी प्रतिक्रिया दिली. “भाजप लोकांचा सन्मान आणि आदर करत नाही. इथे केवळ संधीसाधू आणि भ्रष्ट लोकांचाच बोलबाला असून भाजपमध्ये मला मानसन्मान नव्हता. मी पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली होती पण आता भाजपमध्ये मला कोणताही मान राहिलेला नाही. महिला म्हणून पक्षात राहणे माझ्यासाठी कठीण बनले होते,” असे सुजाता खान यांनी सांगितले.

सौमित्र खान हे बिश्नुपूर मतदारसंघाचे खासदार असून ते भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षही आहेत. पत्नी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्याने सौमित्र खान यांचा संताप अनावर झाला आहे. खासदार सौमित्र खान यांनी थेट नाते संपवण्याचे म्हटले आहे. सौमित्र खान यांनी सुजाता यांना घटस्फोटाची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटाची नोटीस पाठवण्याचा निर्णय घेताना सुजाता खान यांची कार आणि बरजोरामधील घराची सुरक्षाही काढून घेतली आहे. दरम्यान, सौमित्र खान यांनी तृणमूल काँग्रेसवर पत्नीच्या चोरीचा आरोप केला आहे. तृणमूल संसार मोडत असून आता त्यांना सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे सौमित्र खान म्हणाले.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -