घरताज्या घडामोडीविमानसेवा रोखल्यामुळे ब्रिटनमध्ये अडकले भारतीय विद्यार्थी आणि कुटुंब

विमानसेवा रोखल्यामुळे ब्रिटनमध्ये अडकले भारतीय विद्यार्थी आणि कुटुंब

Subscribe

जगभरातील अनेक देश सध्या कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याकरिता कोरोना लसी तयार करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. ब्रिटन, कॅनडा, अमेरिका यासारख्या काही मोठ्या देशांनी कोरोना लसीकरणाला सुरुवात केली आहे. पण यादरम्यान ब्रिटनमध्ये एक नवा कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. त्यामुळे भारतासह युरोपामधील अनेक देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. पण यामुळे ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि ब्रिटनमध्ये राहणाऱ्या कुटुंबांवर परिणाम झाला आहे. विद्यार्थी आणि कुटुंबा आपल्या भारतातील कुटुंबियांसोबत आणि मित्र-मैत्रीणीसोबत ख्रिसमस आणि नववर्षाचे सेलिब्रिशन करण्यासाठी भारतात परत येणार होते. पण सोमवार भारताने ब्रिटनहून येणारे सर्व विमाने ३१ डिसेंबरपर्यंत रोखण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यासमोर एक नवी समस्या उभी झाली आहे.

ब्रिटन विद्यापिठाच्या कॅम्पसमध्ये चाचण्या केल्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीला भारतात परतण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवास करण्याची योजना आखली होती. तसेच काही जणांनी ब्रिटन क्षेत्रामधील सर्वात स्वस्त प्रवासाच्या कालावधीत विमानांची तिकिट बुक केली होती. जरी पर्यटक व्हिसा मोठ्या प्रमाणात सस्पेंड असला, तरी कौटुंबिक कारणास्तव विद्यार्थ्यांना आणि कुटुंबांना भारतात परतायचे होते.

- Advertisement -

नॅशनल इंडियन स्टूडँट्स अँड Aluminium युनियन यूके (निसा-युके) मधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी प्रतिनिधी गटचे अध्यक्ष सनम अरोरा म्हणाले की, ‘भारतीय विद्यार्थ्यांकडून आणि परदेशी लोकांकडून अशा दोन्ही बाजूंनी चिंता व्यक्त केली जात आहे.’

नववर्ष सुरू होण्याआधी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आणि कुटुंबांनी सुट्टीच्या कालावधीत भारतात परत येण्याचा विचार केला होता. पण भारताने सोमवारी घेतलेल्या निर्णयामुळे ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थी आणि कुटुंब अडकले आहेत. दरम्यान आता ब्रिटननंतर आफ्रिकेत देखील हा नवा कोरोना व्हायरस आढळल्याचे समोर आल्यामुळे सध्या सर्व देश चिंतेत आहे. भारतात ब्रिटनमधून कालपासून परतलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन केले असून त्यांना हॉटेल खर्च करावा लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाचा कहर: अमेरिकेत ३३ सेकंदात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -