घरदेश-विदेशलोकसभेसाठी 'बसपा' तयार, ५५ ते ६० जागा लढवणार

लोकसभेसाठी ‘बसपा’ तयार, ५५ ते ६० जागा लढवणार

Subscribe

लोकसभा २०१९च्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने कंबर कसली आहे. लोकसभेसाठी बसपा मध्यप्रदेशातून ५५ ते ६० जागा लढवणार असल्याची घोषणा बसपाचे मध्यप्रदेश अध्यक्षा नर्मदा प्रसाद अहिरवार यांनी केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर बसपाने मतदारसंघांची चाचपणी आणि उमेदवारांच्या निवडीला देखील सुरूवात केली आहे.

लोकसभा २०१९च्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने कंबर कसली आहे. लोकसभेसाठी बसपा मध्यप्रदेशातून ५५ ते ६० जागा लढवणार असल्याची घोषणा बसपाचे मध्यप्रदेश अध्यक्षा नर्मदा प्रसाद अहिरवार यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर बसपाने मतदारसंघांची चाचपणी आणि उमेदवारांच्या निवडीला देखील सुरूवात केली आहे. बसपाचे चंबळ आणि रेवा भागात मिळून ४ खासदार आहेत. पक्षाध्यक्ष मायावती यांनी ५५ ते ६० जागी लढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उमेदवार निवडीसह मतदार संघाच्या चाचपणीवर देखील आम्ही भर देत असल्याचे नर्मदा प्रसाद अहिरवार यांनी सांगितले.

बसपाची कुणाशी हातमिळवणी?

निवडणुकीपूर्वी हातमिळवणी करण्यासाठी काँग्रेसशी कोणतीही बोलणी झालेली नाहीत. दरम्यान,मागील महिन्यात आम्ही समविचारी पक्षांच्या एकीसाठी प्रयत्न केल्याचे मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे अध्यक्ष कमनलाथ यांनी सांगितले. मध्यप्रदेशमध्ये आजघडीला तरी काँग्रेस हाच भाजपचा मुख्य विरोधी पक्ष आहे. त्यामुळे भाजपविरोधात समविचारी पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला किती यश येते हे देखील लवकरच स्पष्ट होईल. बसपासोबत हातमिळवणी केल्यास त्याचा फायदा हा काँग्रेसलाच जास्त होईल असा दावा बसपाकडून केला जात आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचे मनोबल का खच्ची करा? असा सवाल देखील बसपाने विचारला.

- Advertisement -

मध्यप्रदेशात बसपाला जनाधार किती?

सपासोबत ( समाजवादी पार्टी ) हातमिळवणी केल्यास बसपाला काहीही फायदा होणार नसल्याचा दावा बसपाकडून केला जात आहे. २०१३च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला ४५ टक्के, काँग्रेसला ३६ टक्के तर बसपाला ६ टक्के मते मिळाली होती. मतांची टक्केवारी पाहिल्यानंतर देखील बसपाने सपा, काँग्रेससोबत देखील हातमिळवणी करण्यास नकार दिला आहे. काँग्रेसशी समविचारी पक्षांशी युती करण्यास काँग्रेसचे प्राधान्य असेल. आम्ही पक्षाध्यक्ष राहुल गांधींच्या आदेशानुसारच काम करत असल्याचे यावेळी मध्यप्रदेश काँग्रेसने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -