घरदेश-विदेशभाजपच्या संकल्पपत्रात आश्वासनांचा पाऊस

भाजपच्या संकल्पपत्रात आश्वासनांचा पाऊस

Subscribe

समान नागरी कायदा, राम मंदिर, शेतकर्‍यांना पेन्शन

राष्ट्रवाद, राम मंदिराची उभारणी, जम्मू-काश्मीरमधून ३५-अ कलम हटवणे, आयकर टप्प्यांचा पुनर्आढावा आणि शेतकर्‍यांना दरवर्षी ६ हजार रुपये देणे अशा आश्वासनांचा पाऊस पाडत भारतीय जनता पक्षाने सोमवारी आपला लोकसभा निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला.‘संकल्प पत्र’ या नावाने प्रसिध्द करण्यात आलेल्या या जाहीरनाम्याचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शहा,केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपच्या पहिल्या दोन खासदारांपैकी अटलबिहारी वाजपेयी हे शेवटच्या पानावर तर लालकृष्ण अडवाणी हे संकल्प पत्रातून बाहेर पडल्याने मोदींचीच छबी दिसत

राष्ट्रवादी ही आमची प्रेरणा आहे आणि चांगले सरकार हा आमचा मंत्र, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. २०४७ सालापर्यंत म्हणजे स्वातंत्र्याला १०० वर्षे होत असताना देशाला पूर्णत: विकसित राष्ट्र म्हणून पुढे आणण्याचे लक्ष्य भाजपच्या संकल्प पत्राचे आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

आमचे संकल्प पत्र हे एक व्हिजन डॉक्युमेंट आहे. त्यात १३० कोटी भारतीयांची आशा आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. आम्ही राष्ट्रवादी आणि दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी पूर्णत: कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले. देशात समान कायदा लागू करणे आणि अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी आम्ही प्रतिज्ञाबद्ध आहोत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सदनात संमत करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, मात्र तसे करताना त्या-त्या राज्याची संस्कृती कायम राहील याचीही काळजी घेतली जाईल.

ग्रामविकासासाठी २५ लाख कोटी रुपये आगामी पाच वर्षांत खर्च केले जातील. तसेच देशातील प्रत्येक शेतकर्‍याला दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातील. तसेच लहान आणि मध्यम शेतकर्‍यांना त्यांच्या वयाच्या ६० वर्षांनंतर निवृत्ती वेतन दिले जाईल.

- Advertisement -

काँग्रेसची टीका
संकल्पनामा म्हणजे एका व्यक्तीची ‘मन की बात’
“जाहीरनाम्याचा फोटो आम्हाला सांगतो की आमच्यासाठी देशातील लोक महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी फक्त आपला चेहरा. आमच्या जाहीरनाम्यात देशातील करोडो लोकांचे विचार आहेत. तर भाजपच्या जाहीरनाम्यात फक्त एकाच व्यक्तीची ‘मन की बात’. आता देश आपल्या मनातील निर्णय ऐकवेल.”

भाजपचे महत्त्वाचे संकल्प
राष्ट्रवाद आणि दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कटिबद्ध.
संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करणार.
मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी आयकर टप्प्यांचा पुनर्आढावा घेणार
सीमेपलिकडून होणारी घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न करणार.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा, राज्यसभेत मंजूर करून लागू करणार.
सौहार्दपूर्ण वातावरणात लवकरच राम मंदिर उभारणार.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३५- अ हटवणार.
देशातील सर्वच शेतकर्‍यांना वर्षाला ६ हजार देणार.
सर्व छोट्या शेतकर्‍यांना वयाच्या साठीनंतर पेन्शन देणार.
क्रेडिट कार्डवर मिळणार्‍या १ लाखापर्यंतच्या कर्जावर ५ वर्षांपर्यंत व्याज आकारणार नाही.
देशातील छोट्या दुकानदारांना वयाच्या साठीनंतर पेन्शन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -