घरदेश-विदेशBlack Fungus : काळी बुरशीवरुन राहुल गांधींचे केंद्राला तीन प्रश्न

Black Fungus : काळी बुरशीवरुन राहुल गांधींचे केंद्राला तीन प्रश्न

Subscribe

देश कोरोनाविरुद्धची लढाई लढत असताना आता लोकांना काळ्या बुरशीचा (Black Fungus) संसर्ग होत आहे. यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत. या विरोधात लढण्यासाठी केंद्राची काय तयारी आहे? काळ्या बुरशीवरील औषध मिळण्यासाठी सरकारचा काय प्लॅन आहे? असे प्रश्न राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केले आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारला फटकारलं आहे. ट्विट करून राहुल गांधींनी मोदी सरकारला काळ्या बुरशीबद्दल तीन प्रश्न विचारले. राहुल गांधी म्हणाले की काळ्या बुरशीच्या औषधाच्या कमतरतेबाबत सरकार काय करत आहे? या व्यतिरिक्त, राहुल गांधींनी विचारलं आहे की हे औषध रुग्णांना देण्याची प्रक्रिया काय आहे आणि उपचार देण्याऐवजी मोदी सरकार औपचारिकतेत जनतेला का गुंतवित आहे? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या तयारीवरुन राहुल गांधी पंतप्रधानांना सतत लक्ष्य करत आहेत. यापूर्वी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या शून्य लस धोरणावर प्रश्न उपस्थित केले होते. हे धोरण भारत मातेच्या छातीत खंजीर खुपसण्याचं काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. साथीच्या काळात बेरोजगारी ज्या पद्धतीने शिगेला पोहोचली आहे, त्यावरुन देखील राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला होता.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -