घरताज्या घडामोडीप्रवासी मजुरांचा मसीहा सोनू सूदची आणखी एक मोठी घोषणा

प्रवासी मजुरांचा मसीहा सोनू सूदची आणखी एक मोठी घोषणा

Subscribe

बॉलिवूडचा अभिनेता सोनू सूद आपल्या चित्रपटांपेक्षा अधिक लॉकडाऊनमध्ये केलेल्या कामामुळे अधिक प्रसिद्ध झाला आहे. सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांना घरी जाण्यासाठी मदत केली. त्यानंतर मागेल त्याला मदत असे घोषवाक्यच सोनूला लागू पडावे, एवढा मदतीचा सपाटा त्याने लावला आहे. मजुरांना घरी जाण्याची मदत देऊन त्यांना रेशनपाणी दिल्यानंतर सोनू या मजुरांची आता रोजगाराची व्यवस्था करणार आहे. तब्बल एक लाख मजुरांना नोकरी देण्याचे आश्वासन सोनूने दिले आहे.

सोनूने ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. सोनूने ट्विट केले आहे की, APEC नावाच्या कंपनीसोबत त्याने हातमिळवणी केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून तो एक लाख मजुरांना नोकरी देऊ शकणार आहे. जहा चाह, वरा राह! या वाक्यासहीत http://pravasirojgar.com च्या माध्यमातून देशभरात कपड्याच्या कारखान्यात आणि निर्यात करणाऱ्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होतील, असे त्याने म्हटले आहे.

- Advertisement -

सोनूने याआधी देखील ३ लाख प्रवासी मजुरांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. ३० जुलै रोजी ट्विटरवरच सोनूने ही माहिती दिली होती. “माझ्या जन्मदिनाच्यानिमित्त तीन लाख मजुरांना नोकरी देणार आहे. सर्वांना चांगले वेतन, पीएफ, ईएसआय सारखे लाभ देखील मिळतील.” हे आश्वासन देत असताना सोनूने AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co आणि Portea यां कंपन्यांचे आभार मानले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -