घरदेश-विदेशअमेरिकेत बॉम्ब चक्रीवादळ; बर्फाळ वाऱ्यांमुळे हवाई उड्डाणे रद्द, रेड अलर्ट जारी

अमेरिकेत बॉम्ब चक्रीवादळ; बर्फाळ वाऱ्यांमुळे हवाई उड्डाणे रद्द, रेड अलर्ट जारी

Subscribe

Bomb Cyclone | विमान, रेल्वेसह इतर अनेक वाहतूक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहने बर्फात अडकली आहेत. हजारो अमेरिकन विमानतळांवर अडकून पडले आहेत. संपूर्ण अमेरिकेत या वादळाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन – भारतासह जगभरातील अनेक देशात तापमानात कमालीची घट होत असून अमेरिकेत चक्क बॉम्ब चक्रीवादळ (Bomb Cyclone) निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या अनेक भागांत उणे ८ अंश सेल्सिअस वातावरण आहे. त्यामुळे येथे बर्फाचे वादळ निर्माण झाले आहे. या बॉम्ब चक्रीवादळामुळे आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच, संपूर्ण युएसमध्ये बर्फाळ वारे वाहत आहेत. यामुळे शनिवारी दुपारपर्यंत येथील विमान कंपन्यांनी जवळपास ५२०० उड्डाणे रद्द केली होती. ऐन नाताळात विमानउड्डाणे रद्द झाल्याने पर्यटकांची निराशा झाली आहे.

हेही वाचा – श्रीमथि केसन, शून्य गुरुत्वाकर्षणात आकाशात झेपावणारी पहीली भारतीय महिला

- Advertisement -

संपूर्ण अमेरिकेत बर्फाळ वारे वाहत आहेत. कॅनडाच्या सीमेजवळील हाव्रे, मोंटाना येथे उणे ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विमान, रेल्वेसह इतर अनेक वाहतूक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहने बर्फात अडकली आहेत. हजारो अमेरिकन विमानतळांवर अडकून पडले आहेत. संपूर्ण अमेरिकेत या वादळाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाची ऊर्जा व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे अनेकजण अंधारात आहेत. वादळामुळे ट्रान्समिशन लाईन्सचे नुकसान झाले आहे. 20 लाखांहून अधिक घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे.

बॉम्ब चक्रीवादळ अत्यंत धोकादायक

- Advertisement -

बॉम्ब चक्रीवादळांमुळे बर्फाळ वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडतो. जेव्हा थंड हवा उबदार हवेशी आदळते तेव्हा चक्रीवादळ तयार होते. या प्रक्रियेला बांबोजेनेसिस म्हणतात. बॉम्ब चक्रीवादळे सहसा हिवाळ्यात येतात, कारण ही चक्रीवादळे थंड आणि उबदार हवेच्या मिलनामुळे तयार होतात. वायव्य अटलांटिक, वायव्य पॅसिफिक आणि कधीकधी भूमध्य समुद्रावर बॉम्ब चक्रीवादळे तयार होतात. नॅशनल वेदर सर्व्हिसचे हवामानशास्त्रज्ञ जॉन मूर यांनी सांगितले की, ग्रेट लेक्स प्रदेशातील थंड आर्क्टिक हवा पूर्वेकडे जास्त गरम हवेशी जुळल्यावर बॉम्ब चक्रीवादळ तयार झाले.

हेही वाचा – कोरोनाचा धोका वाढला; चीनसह ‘या’ 5 देशांमधून येणाऱ्यांसाठी RT-PCR चाचणी बंधनकारक

हिटर्स सेंटर्स

हिवाळ्यात तापमानात घट झाल्यामुळे थंडीचा तडाखा वाढला आहे. यामुळे वाचनालये आणि पोलीस ठाण्यांमध्ये हिटर सेंटर्स उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, बेघरांसाठी तात्पुरता निवाऱ्याची सोय करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -