घरदेश-विदेशजगात पहिल्यांदाच झालं अनोखं ऑपरेशन; चिमुरडीच्या नाकाद्वारे काढलं ब्रेन ट्यूमर

जगात पहिल्यांदाच झालं अनोखं ऑपरेशन; चिमुरडीच्या नाकाद्वारे काढलं ब्रेन ट्यूमर

Subscribe

सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या ऑपरेशनची चर्चा सुरू

सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या ऑपरेशनची चर्चा सुरू आहे. चंदीगड पीजीआयच्या डॉक्टरांनी उत्तराखंडमधील १६ महिन्यांची मुलगी अमायराच्या ब्रेन ट्यूमरला तिच्या नाकाद्वारे काढले. अशा तरुण रूग्णांवर जगातील ही पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली असल्याचे सांगितले जात आहे. हा ब्रेन ट्यूमर तीन सेंटीमीटरचा असला तरी तो या चिमुकल्या रुग्णाच्या वयानुसार बराच मोठा होता. २०१९ मध्ये, २ वर्षांच्या मुलाची स्टॅनफोर्ड येथे शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर जगात पहिल्यांदाच झालेल्या या अनोख्या ऑपरेशनची चर्चा आहे. ६ जानेवारी रोजी वैद्यकीय टीमने हा ट्यूमर काढून टाकण्यासाठी ६ तासांची शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर ही चिमुकली रुग्ण आता पूर्णपणे ठीक आहे, या चिमुकल्या रूग्णाला आज शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अमायरा ही चिमुकली मूळची हरिद्वारची आहेत.

- Advertisement -

अमायराचे वडील कुरबान अली कपड्यांचे दुकान चालवतात. त्यांनी असे सांगितले की, ‘ही बाब २० डिसेंबरची आहे. संध्याकाळी ४ वाजता अमायरा झोपेतून उठली. आई गुलनारने तिला मांडीवर घेत चिप्स खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. चिप्स पकडण्याच्या प्रयत्नात ती होती. त्यानंतर अशी शंका आली की कदाचित मुलगी योग्य प्रकारे पाहू शकत नाही. हरिद्वारमधील खासगी रुग्णालयात सीटी स्कॅन, एमआरआय केले. यामध्ये एक ट्यूमर आढळला. यानंतर या चिमुरडीला पुढील उपचारांसाठी चंदीगढच्या डॉक्टरांकडे पाठवण्यात आले.

या अनोख्या शस्त्रक्रियेविषयी डॉ. रिजुनिता गुप्ता यांनी असे सांगितेल की, ‘शस्त्रक्रियेच्या एका दिवस आधी ही प्रक्रिया कशी पूर्ण करता येईल याचाच विचार करत राहिलो. ही शस्त्रक्रिया लहान मुलीवर करण्यात येणार असल्याने विशेषतः लहान शस्त्रांचा वापर करण्यात आला. दरम्यान, आव्हान असे होते की चिमुरडीच्या नाकपुड्या लहान होत्या आणि बऱ्याच शस्त्रांचा वापर करून ही शस्त्रक्रिया करायची होती. यावेळी ब्रेन फ्लुइड बाहेर येण्याचा धोका देखील होता. यासाठी नॅझो पॅप्टल फ्लॅप वापरला गेला. अशा लहान मुलाच्या नाकात ते हलविणे आणि दुरुस्त करणे सोपे नव्हते. सायनस विकसित झाले नाही, परंतु डायमंड ड्रिलने नाकात दुसरा मार्ग तयार करण्यात आला.

- Advertisement -

६ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता चिमुरडीला ऑपरेशन थिएटरमध्ये आणले होते. तिला कॅन्युला लावून भूल देण्याचा डोस दिला गेला. नॅव्हिगेशनद्वारे संगणकाशी स्कलदेखील कनेक्ट करण्यात आले. सकाळी ९ वाजता ऑपरेशन प्रक्रिया सुरू झाली. नाकातून मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी ड्रिल करण्यात आले. या लहान मुलीचे हाडं खूपच नाजूक होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करणं थोडं अवघड आणि आव्हानात्मकच होतं, ही शस्त्रक्रिया करायला ३ तास लागले, असे डॉ. दंडपाणि एसएस यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -