घरअर्थजगतBudget 2022 : तरुणांसाठी 60 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार, अर्थसंकल्पात मोदी...

Budget 2022 : तरुणांसाठी 60 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार, अर्थसंकल्पात मोदी सरकारची मोठी घोषणा

Subscribe

केंद्र सरकारने ६० लाख नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली आहे. देशात मेक इन इंडियाअंतर्गत ६० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सलग चौथा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे. २०२२-२३ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून तरुणांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय कौशल्य योजनेमधून तरुणांना नोकरीसाठीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यंदाच्या वर्षात ६० लाख तरुणांना रोजगार देणार असल्याची घोषणा करुन विरोधकांना उत्तर दिलं आहे. आत्मनिर्भर भारतअंतर्गत १६ लाख नोकऱ्या देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटलं आहे. इंडस्ट्रीच्या मागणीनुसार तरुणांना प्रशिक्षण देण्यात येईल जेणेकरुन तरुणांना रोजगार मिळेल असे केंद्र सरकारचे धोरण आहे.

केंद्र सरकारकडून वर्ष २०२२-२३ साठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शेती, डिजिटल, नोकरी आणि आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. नॅशनल स्किल क्वालिफीकेशन प्रोग्राम हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. सध्याची जी इंडस्ट्रीची मागणी बदलत आहे. त्या दृष्टीने युवकांना ट्रेनिंग देण्यात यावे यासाठी योजना करण्यात आली आहे. असे निर्मला सीतारामण म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करुन देण्यावरुन केंद्र सरकार नेहमी विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहे. नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरली असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. परंतु आता केंद्र सरकारने ६० लाख नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली आहे. देशात मेक इन इंडियाअंतर्गत ६० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

- Advertisement -

स्टार्ट अप्स करणाऱ्यांसाठी ड्रोन शक्ति योजना

राष्ट्रीय कौशल्य योजनेमधून रोजगार निर्मिती, युवकांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. ज्यांना नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात येणार आहे. यामुळे युवकांना इंडस्ट्रीला काय पाहिजे याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. ज्यांना स्टार्ट अप्स करायचे आहे त्यांच्यासाठी ड्रोन शक्ति ही योजना आहे. या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.


हेही वाचा : Union Budget 2022 : विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘वन क्लास वन टीव्ही चॅनल्स’ची घोषणा, अंगणवाड्यांना सक्षम बनवणार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -