घरदेश-विदेशराजीव गांधी हत्येतील आरोपींच्या सुटकेसाठी राज्यपालांकडे दयेचा अर्ज

राजीव गांधी हत्येतील आरोपींच्या सुटकेसाठी राज्यपालांकडे दयेचा अर्ज

Subscribe

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील सातही आरोपींच्या सुटकेसाठी तामिळनाडू सरकारने राज्यपालांकडे शिफारस अर्ज दाखल केला आहे.

तामिळनाडू सरकारने आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येसंबंधीत केसमध्ये महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एआयएडीएमके सरकारने या प्रकणातील सर्वच्या सर्व सात आरोपीच्या सुटकेसाठी अनुच्छेद १६१ च्या अंतर्गत राज्यपालांकडे दयेचा अर्ज केला आहे. या आरोपींना मुक्त करण्याच्या तामिळनाडी सरकारच्या निर्णयाला यापू्र्वीही केंद्र सरकारने कडाडून विरोध केला होता. अशा प्रकारचे निर्णय हे देशासाठी घातक ठरू शकतात, यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंधावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे मत केंद्राने नोंदवले होते.

 

- Advertisement -

राज्यपालांकडे सुटकेसाठीचे अधिकार

राज्याचे मंत्री डी. जयाकुमार यांनी यासंदर्भात सांगितले की, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी की अध्यक्षतेखाली साधारण दोन चाललेल्या बैठकीत या प्रकरणी राज्यपालांना दयेचा अर्ज पाठवण्यासंबंधी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. त्यांनी असे म्हटले की, राज्यपालांकडे आरोपींना मुक्तता देण्याचे अधिकार असून ते सरकारच्या निर्णयाचा सकारात्मक विचार करतील.

- Advertisement -

२७ वर्षांपासून सातही आरोपी तुरुंगात

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्ये प्रकरणी शिक्षा भोगत असलेला आरोपी ए. जी. पेरियावलन बाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असता त्यांनी तामिळनाडू सरकारकडे निर्णय सोपवला होता. या हत्ये प्रकरणी नलिनी श्रीहरन, मुरुगम उर्फ श्रीहरन, पेरियावलन उर्फ अरिवू, रविचंद्रन, संथन आणि जयाकुमार हे आरोपी गेल्या २७ वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तामिळनाडूच्या राजकारणात हा मुद्दा नेहमीच चर्चत राहीला आहे. डीएमके यांनीही सर्व आरोपींच्या सुटकेची मागणी केली होती. २१ मे १९९१ रोजी श्रीपेरंबदून येथील लिट्टे दहशतवाद्यांनी काँग्रेसचे त्यावेळचे अक्ष्यक्ष राजीव गांधी यांची हत्या केली होती.

आरोपीच्या आईचा सरकारवर विश्वास

या प्रकरणी आरोपी ए. जी. पेरियावलनची आई अर्पुथाम्मल यांनी प्रतिक्रिया देताना, राज्यपाल सरकारने केलेल्या दयेच्या अर्जाचा सकारात्मक विचार करतील असे म्हटले आहे. यासंबंधी आपण तामिळनाडू सरकारच्या मंत्र्यांची भेट घेतली असून त्यांनी सातही आरोपींबाबत राज्यपाल नक्की विचार करतील, असे आश्वासन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -