घरदेश-विदेशL'Oreal हेयर प्रॉडक्टचा वापर केल्याने झाला कॅन्सर; अमेरिकेतील महिलेचा दावा

L’Oreal हेयर प्रॉडक्टचा वापर केल्याने झाला कॅन्सर; अमेरिकेतील महिलेचा दावा

Subscribe

अमेरिकेच्या एका महिलेने दावा केला आहे की, L’Oreal च्या हेयर स्ट्रेटनिंग प्रॉडक्टचा वापर केल्याने तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाला आहे. या महिलेच्या वकीलाने सांगितलं की, त्याने या कंपनी विरोधात कोर्टामध्ये खटला दाखल केला आहे. जेनी मिशेल या महिलेने खटला दाखल करत सांगितलं की, मागील दोन दशकांपासून ती या कंपनींच्या उत्पादनांचा वापर करत होती. ज्यामुळे तिला कॅन्सर झाला. काही दिवसांपूर्वी नॅशनल कॅन्सर इंस्टीट्यूटच्या जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशीत झाले होते, ज्यामध्ये केसांना स्ट्रेट करणारे केमिकल प्रॉडक्ट्स वापरल्यास गर्भाशयाच्या कॅन्सरसंबंधित आजार झाला.

संशोधनामध्ये आढळलं की, ज्या महिलांनी चार वर्षांपेक्षा जास्त या प्रोडक्ट्सचा वापर केला, त्यांच्यामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता दुप्पट झाली होती.गर्भाशयाचा कॅन्सर मुख्यतः कमी प्रमाणात आढळतो. मात्र, अमेरिकेमध्ये या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

- Advertisement -

मिशेलच्या वकीलांनी सांगितलं की, कृष्ण वर्णीय महिला अनेक काळापासून अशा खतरनाक प्रॉडक्टच्या शिकार होत आहेत. ज्यांना त्यांच्यासाठी मार्केटमध्ये उतरवण्यात आलं आहे. फ्रांसची सौंदर्य प्रसाधन कंपनी L’Oreal च्या यूएस शाखेकडे नुकसान भरपाई मागण्यात आली आहे.तसेच वकील पुढे म्हणाले की, आम्हाला पाहायला मिळेल की, मिशेल यांचे प्रकरण अगणित प्रकरणांपैकीच एक आहे. ज्यामध्ये कंपनी आपला फायदा करण्यासाठी कृष्ण वर्णीय महिलांची दिशाभूल केली जात आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

मॅक्सिकोमध्ये ऑईल टँकरची धडक; ट्रेन पूर्णपणे जळून खाक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -