घरCORONA UPDATECoronaEffect: 'या' एअरलाईन्समधील १६ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

CoronaEffect: ‘या’ एअरलाईन्समधील १६ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Subscribe

ऑस्ट्रेलियाची दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हर्जिन ऑस्ट्रेलिया या एअरलाईन्समधील तब्बल १६ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत.

कोरोनानंतर जगाला आणखी एका संकटाला सामोरे जायचे आहे आणि ते म्हणजे आर्थिक संकट, असे सर्वच तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. गेल्या २-३ महिन्यांपासून कित्येक देश लॉकडाऊन असल्याचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर संक्रांत येणार आहे. काही प्रमाणारत त्याची सुरूवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाची दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हर्जिन ऑस्ट्रेलिया या एअरलाईन्समधील तब्बल १६ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत. ही कंपनी डबघाईला आली असून यातील कर्मचाऱ्यांना वेतन देण्या इतपतही कंपनीकडे पैसे नसल्याने त्यांच्या नोकऱ्या जाण्याच्या मार्गावर आहेत.

गेल्या महिन्यात सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंदी असताना व्हर्जिन ऑस्ट्रेलिया एअरलाईन्स कंपनी फेडरल सरकारकडून ७८८७ दशलक्ष इतके कर्ज घेण्यास अयशस्वी ठरली. यासंबंधीत दिलेल्या निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, या व्यवसायात पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी आणि कोविड – १९ सारख्या संकटाच्या आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या समूहाने स्वयंसेवी प्रशासनात प्रवेश केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने लेखा फर्म डेलॉइटला यांची प्रशासक म्हणून नियुक्त केली आहे. तर कोविड-१९ मुळे विमान सेवेवर इतिहासातील सर्वाधिक वाईट काळ आणल्याची प्रतिक्रिया व्हर्जिन ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी पॉल स्कर्रा यांनी दिली आहे.

- Advertisement -

सध्या व्हर्जिन ऑस्ट्रेलिया एअरलाईन्समध्ये सुमारे १० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तर ६ हजार लोकं अप्रत्यक्षपणे या कंपनीत काम करत आहेत. गेल्या महिन्यात जवळपास ८ हजार कर्मचार्‍यांना किमान मे अखेरपर्यंत वेतनाशिवाय रजा घेण्यास सांगण्यात आले होते. तसेच विमान कंपनीने कोविड – १९ च्या संकटानंतरही आंतरराष्ट्रीय उड्डाणे निलंबित केली आहेत. सध्या सिडनी आणि मेलबर्न दरम्यान फक्त एक देशांतर्गत सेवा उड्डाण करत अशून तिची सहाय्यक कंपनी टायगॅरर ऑस्ट्रेलियाने सर्व मार्ग बंद केले आहेत, अशीही माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे.

हेही वाचा –

खुषखबर: नाशिकमधील सर्व उद्योग, व्यवसाय सुरु होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -