घरमहाराष्ट्रनाशिकखुषखबर: नाशिकमधील सर्व उद्योग, व्यवसाय सुरु होणार

खुषखबर: नाशिकमधील सर्व उद्योग, व्यवसाय सुरु होणार

Subscribe

रेड झोन आणि ऑरेंज झोनचा तिढा अखेर मंगळवारी (दि. २१) मिटला असून कंटनमेंट झोन वगळता नाशिक जिल्ह्यातील सर्व उद्योग, व्यवसाय, आस्थापना परवानगी घेऊन सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. लॉकडाऊन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शन सुचनांनुसार अटी-शर्थींवर ही सुट देण्यात आली आहे. कन्टेनमेंट झोनचे नकाशे बघता आता सातपूर, अंबडसह ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहतीही सुरु होण्याचा मार्ग खुला झाला आहे. यात प्रथमत: उद्योग सुरु करण्यासाठी एमआयडीसीकडे परवानगी मागितलेले १२०० उद्योग सुरु होतील. नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या पदाधिकार्‍यांनी उद्योग सुरु करण्यासाठी अथक प्रयत्न केले असून या पाठपुराव्याला यश मिळाल्याने सर्वच उद्योजकांत आनंद व्यक्त केला जात आहे.

रेड झोन आणि ऑरेंज झोनचा तिढा अखेर मंगळवारी (दि. २१) मिटला असून कंटनमेंट झोन वगळता नाशिक जिल्ह्यातील सर्व उद्योग, व्यवसाय, आस्थापना परवानगी घेऊन सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. लॉकडाऊन संदर्भात शासनाच्या मार्गदर्शन सुचनांनुसार अटी-शर्थींवर ही सुट देण्यात आली आहे. कन्टेनमेंट झोनचे नकाशे बघता आता सातपूर, अंबडसह ग्रामीण भागातील औद्योगिक वसाहतीही सुरु होण्याचा मार्ग खुला झाला आहे. यात प्रथमत: उद्योग सुरु करण्यासाठी एमआयडीसीकडे परवानगी मागितलेले १२०० उद्योग सुरु होतील. नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या पदाधिकार्‍यांनी उद्योग सुरु करण्यासाठी अथक प्रयत्न केले असून या पाठपुराव्याला यश मिळाल्याने सर्वच उद्योजकांत आनंद व्यक्त केला जात आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वच कारखाने आणि उद्योग, व्यवसाय तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले. त्याचा विपरित परिणाम जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. अशीच परिस्थिती राज्याच्या इतर जिल्ह्यांचीही आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात काही उद्योग व्यवसायांना सुट देण्याचे धोरण अवलंबण्यात आले. या धोरणानुसार मार्गदर्शन सूचना आता जिल्हाधिकार्‍यांना प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी महत्वपूर्ण निर्णय घेतले.

पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच सुट रद्द

शासनाच्या सूचनेनुसार ज्या भागात कन्टेनमेंट झोन जाहीर झालेले आहेत त्या भागात सूट देण्यात येणार नाही. तसेच नव्याने करोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतील त्या भागात ही सुट तत्काळ बंद करण्यात येईल.

या ३१ कन्टेनमेंट झोनमध्ये उद्योग सुरु करण्यास मनाई-

  • नाशिक शहर: गोविंद नगर, नवश्या गणपती मंदिर परिसर, नाशिकरोड, बजरंगवाडी, संजीवनगर.
  • मालेगाव शहर: अक्सा कॉलनी, खुशामद पुरा, बेलबाग, इस्लामाबाद, गुलाबपार्क, कामालपुरा, मोमीनपुरा, नवापुरा, महेवी नगर, जुने आझाद नगर, कुंभारवाडा, एस.एन १५२, सरदार नगर, मदिनाबाद, मोतीपुरा, भैकल्ला, मुस्लीमपुरा, दातार नगर, हकिंमनगर, नूरबाग, जुना आझाद, नया आझाद, सुपर मार्केट, इस्लामपुरा, ज्योतीनगर.
  • चांदवड: नगरपालिका क्षेत्र
  • सिन्नर तालुका: वारेगाव व परिसर
    (या कन्टेनमेंट झोनचा तपशील व भौगोलिक नकाशे हे महापालिका व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात तसेच nashik.gov.in या संकेतस्थळावर देखील ते उपलब्ध आहेत.)

हे आहेत उद्योग, व्यवसायांवरील निर्बंध-

  1. सामाजिक अंतराचे पालन करणे
  2. स्वच्छतेसाठीची सर्व साधने कर्मचार्‍यांना उपलब्ध करुन देणे
  3. मास्क, रुमाला वापरणे सक्तीचे करणे
  4. अज्ञात व्यक्तींशी संपर्क टाळणे

सहाय्यक नगररचनाकार, तहसीलदारांना परवानगीचे अधिकार :

कर्मचार्‍यांना निवासस्थानापासून आस्थापनेपर्यंत पोहचवण्याकरता परवाना देण्याचे अधिकार संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना असतील. असा परवाना मिळवण्यासाठी संबंधितांनी ठरवून दिलेल्या नमुन्यातील अर्ज समक्ष अथवा तहसीलदार यांच्या इमेलवर पाठवावे. या अर्जाचा नमुना nashik.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या सहाय्यक नगर रचनाकार यांना परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
या आदेशाचा भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग कायदा या अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.

- Advertisement -

निमाच्या पाठपुराव्याला अखेर यश :

नाशिक जिल्ह्यातील उद्योग सुरु करण्यासाठी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)ने केंद्रिय लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे चर्चा केली होती. मात्र त्या दरम्यान रेड आणि ऑरेंज झोनचे घोळ सुरु झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑरेंज झोनचा निकष बदलून जेथे १४ दिवसात एकही करोना बाधित रुग्ण आढळला नाही अशाला ऑरेंज झोन जाहीर केले. त्यामुळे काही काळासाठी जिल्ह्यात निराशा पसरली होती. निमाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांशी यासंदर्भात चर्चा केली. त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा बारकाव्याने अभ्यास करुन विशिष्ट अटींवर उद्योगांना सुट दिली. नाशिक जिल्ह्यामध्ये कन्टेनमेंट झोन वगळता, सर्व उद्योग सुरु होऊ शकतात असे स्पष्ट उल्लेख केला आहे. कन्टेनमेंट झोनचे नकाशे बघितल्यास सातपूर अंबड आद्योगिक वसाहत पूर्णपणे सुरु होऊ शकतात. आदेशात सांगितल्याप्रमाणे कार्यवाही करून, काळजी घेऊन उद्योग सुरु करावे, असे आवाहन निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, औद्योगिक विकास धोरण समितीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी केले आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही उद्योग सुरु करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. त्यासाठी जवळपास १२०० उद्योगांनी परवानगी मागितली आहे. या अर्जांची छाननी करुन आम्ही परवानगी देऊ. मात्र उद्योग सुरु करताना उद्योजकांना अटींचे पालन करणे अनिवार्य असेल.
– नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक

खुषखबर: नाशिकमधील सर्व उद्योग, व्यवसाय सुरु होणार
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -