घरदेश-विदेशसीबीआयला मोठे यश; बँक लुटारूची घरवापसी

सीबीआयला मोठे यश; बँक लुटारूची घरवापसी

Subscribe

सामान्य माणूस मोठ्या कष्टाने जमवलेला पैसा बँकात जमा करत असतो. मात्र काही घोटाळेबाज जनतेच्या पैशांवर डल्ला मारून देशाबाहेर पळ काढतात. आतापर्यंत विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यासारंख्या उद्योगपतींनी बँकाना हजारो कोटींचा गंडा घालून देशाबाहेर पोबारा केला आहे. अशा घोटाळेबाजांना पकडण्यासाठी सीबीआयने फास आवळायला सुरुवात केली आहे. नुकतेत सीबीआयच्या पथकानने मोहम्मद याहया (४७) याला अटक केली आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद याहयाचा शोध घेतला असता तो बेहरीनमध्ये असल्याचे कळले. त्यानंतर भारताच्या विनंतीनुसार इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नल नोटीस काढली.

मोहम्मह याहयाची पार्श्वभूमी

नीरव मोदी, विजय माल्या यांनी बँकातून हजारो कोटींचे कर्ज काढून त्यांनतर देशाबाहेर पळ काढल्याची उदाहरणे ताजी आहेत. मोहम्मद याहयाने २००३ मध्ये भारतीय बँकेत घोटाळा केला होता. नऊ वर्षांपूर्वी त्याने बँकेला ४६ लाखांचा गंडा घालत बंगळुरूहून थेट विदेशात पलायन केले होते. त्यानंतर २००९ साली या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -