Bipin Rawat Chopper Crash : CDS बिपिन रावत हेलिकॉप्टर क्रॅश, कोर्ट ऑफ इन्क्वायरीत कारण स्पष्ट

CDS-Crash-New

सीडीएस जनरल बीपिन रावत हेलिकॉप्टर दुर्घटनेतील अहवाल प्रकरणातील चौकशी अहवाल समोर आला आहे. कोर्ट ऑफ इंक्वायरीमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेची कारणे समोर आली आहेत. त्यामध्ये हेलिकॉप्टरमधील तांत्रिक अडचण, तोडफोड किंवा कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा यासारख्या शक्यता फेटाळून लावण्यात आल्या आहेत. तसेच या संपूर्ण प्रकरणात कोणतेही कटकारस्थान नसल्याचेही वायू सेनेने अहवालाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. भारतीय वायूसेना (Indian Airforce) ने स्पष्ट केले की, हेलिकॉप्टर दुर्घटनेत (Mi-17 V5) च्या ट्राई सव्हीसेस कोर्ट ऑफ इंक्वायरी अंतर्गतच्या अहवालातून प्राथमिक निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश दुर्घटनेत सीडीएस बिपिन रावत आणि अन्य १३ जणांचा मृत्यू झाला होता.

वायुसेनेने दाखल केलेल्या अहवालात आठ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेत अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळेच ही घटना घडल्याची नोंद आहे. त्यामध्ये अचानक ढगांच्या प्रवेशामुळेच हा अपघात झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ढगांच्या अचानक झालेल्या गर्दीमुळेच पायलटचे हेलिकॉप्टर भरकटले असेही अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. चौकशी समितीने वायुदल आणि भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यासोबतच स्थानिक लोकांसोबतही झालेल्या चर्चेनुसार प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यासोबतच हेलिकॉप्टर क्रॅशपूर्वी शूट झालेल्या व्हिडिओचीही चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर हेलिकॉप्टरचा एफडीआर म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजे ब्लॅक बॉक्सही हस्तगत करण्यात आला होता. भारतीय वायुदलाच्या प्रशिक्षण विभागाचे कमांडिंग इन चीफ, एअर मार्श मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात ट्राय सर्विस इंक्वायरीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण दुर्घटनेच्या कारणांची चौकशी या समितीच्या माध्यमातून करण्यात आली.

८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टर क्रॅश दुर्घटना

गेल्या वर्षी ८ डिसेंबर २०२१ रोजी भारतीय वायू दलाचे हेलिकॉप्टर एमआय १७ हे कु्न्नुर येथे क्रॅश झाले होते. या दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यंची पत्नी मधूलिका रावत यांच्यासह अन्य १२ अधिकाऱ्यांनी प्राण गमावले होते. चीफ ऑफ डिफेंस स्टाफच्या भूमिकेत जनरल बिपिन रावत हे देशातील तिन्ही सैन्याचे एकत्रिक काम करण्याच्या क्षमतावाढीवर काम करत होते. त्यामध्ये तिन्ही दलांच्या आधुनिकीकरणाच्या क्षेत्रातही त्यांची महत्वाची अशी भूमिका होती.