घरदेश-विदेशप्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीसाठी केंद्र सरकारने परवानगी नाकारली

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीसाठी केंद्र सरकारने परवानगी नाकारली

Subscribe

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीच्या रिंग रूटवर ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी केंद्र सरकारने मनाई केल्याची माहिती क्रांतीकारी किसान युनियनचे दर्शन पाल यांनी स्पष्ट केले. सुरक्षा कारणांमुळे ही मनाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी मिळवण्यासाठी शेतकरी संघटना आणि दिल्ली पोलिसांमध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सुरक्षा कारणांमुळे ही परवानगी देता येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पण आम्ही केंद्र सरकारसोबत आणखी एक बैठक घेऊन ट्रॅक्टर मोर्चा काढणारच असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही ट्रॅक्टर परेड ही दिल्ली रिंगरूटलाच काढणार आहोत या निर्णयावर शेतकरी संघटना ठाम आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नवीन कृषी कायद्याविरोधातील विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी संघटनांकडून ही रॅली काढण्यात येणार आहे.

पोलिसांनी या बैठकीत शेतकरी संघटनांना सांगितले की रिंग रोडवर परेड काढणे हे खूपच संवेदनशील भागातून परेड काढण्यासारखे आहे. जर प्रजासत्ताक दिन नसता तर आम्ही परवानगी दिली असती असे पोलिसांनी या बैठकीत स्पष्ट केले. पण शेतकरी संघटनांनीही आम्ही त्याच मार्गावर रॅली काढणार असल्याचे स्पष्ट केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारी परेड सुरळीत व्हावी यासाठी आम्ही बांधील आहोत अशी माहिती दिलल्लीचे सहपोलिस आयुक्त (वाहतूक) यांनी स्पष्ट केले. शेतकरी संघटना आणि पोलिसांमध्ये सिंघु बॉर्डर येथे ट्रॅक्टर रॅलीसाठीचा मार्ग आणि तयारी याबाबतची बैठक पार पडली.

- Advertisement -

देशभरातून शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकरी हे दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीत सहभागी होण्यासाठी येऊ लागले आहेत. आम्हाला आशा आहे सरकार या रॅलीसाठी लवकरच परवानगी दिली जाईल, असे स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केले. याआधी झालेल्या बुधवारच्या बैठकीत पोलिस आणि शेतकरी संघटना यांच्यात विज्ञान भवन येथे बैठक पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाने याआधीच ट्रॅक्टर रॅलीबाबत कोणताही हस्तत्रेप करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा पोलिसांच्या अखत्यारीतील विषय असून त्याबाबतचा निर्णय पोलिसांनी घ्यावा असे भारताचे मुख्य सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी स्पष्ट केले होते.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -