घरदेश-विदेशकबड्डीची मॅच खेळताना आला हार्ट अटॅक, मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ झाला व्हायरल

कबड्डीची मॅच खेळताना आला हार्ट अटॅक, मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ झाला व्हायरल

Subscribe

कबड्डी खेळता खेळता त्याला हार्ट अटॅक आल्याने त्याच जागीच मृत्यू झाला.

जन्माला आलेल्या प्रत्येकाचा एक दिवस मृत्यू होणार आहे. पण कोणाला कधी आणि कसे मरण येईल हे काही सांगता येत आहे.छत्तीसगड मधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कबड्डीची मॅच खेळता खेळता खेळाडूला अचानक हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅकमुळे खेळाडूचा जागीच मृत्यू झाला. सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे त्याच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील गोजी गावात कबड्डीच्या स्पर्धा सुरू होत्या. २० जानेवारीला नंदू साहू हा खेळाडू आपल्या टिमला घेऊन मैदानात उतरला. मॅचमध्ये खेळण्याची नंदूची बारी आली. समोरच्या टिमने नंदूला घेरुन त्याला हरवले. मात्र त्याच क्षणी नंदू त्याच्या आयुष्याचा डावही तो हरला होता. कबड्डी खेळता खेळता त्याला हार्ट अटॅक आल्याने त्याच जागीच मृत्यू झाला.

कबड्डीच्या पहिल्याच डावात नंदूच्या छातीत दुखू लागले. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. खेळता खेळता नंदूच्या झालेल्या अचानक मृत्यूमुळे उपस्थित सगळ्याच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. कबड्डीची स्पर्धा पहायला आलेल्या सर्व प्रेक्षकांना नंदूचा मृत्यू पहावा लागला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. कबड्डीची मॅच तात्काळ थांबवण्यात आली. या स्पर्धेत आसपासच्या अनेक गावातील टिमने सहभाग घेतला होता.

- Advertisement -

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी नंदूचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर नंदूचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे पाठविण्यात आला. नंदूचा मृत्यू झाला तेव्हा एक लाईव्ह व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. या प्रकाराची चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. नंदूच्या टिममध्ये असलेल्या सर्व टिम मेंमर्सची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

- Advertisement -

हेही वाचा – १५० फूट उंचावर पॅराग्लाईडरचा तुटला दोर, पायलटसह पर्यटकाचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -