घरदेश-विदेशChatGPT च्या OpenAI कडून भारतात पहिल्या महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती; शैक्षणिक पात्रता किती...

ChatGPT च्या OpenAI कडून भारतात पहिल्या महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती; शैक्षणिक पात्रता किती पाहा…

Subscribe

Chat GPT डेव्हलपर OpenAI कंपनीने भारतात पहिल्या महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. कंपनीने 39 वर्षीय प्रज्ञा मिश्रा यांची 'सरकारी संबंध प्रमुख' म्हणून नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली : Chat GPT डेव्हलपर OpenAI कंपनीने भारतात पहिल्या महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. कंपनीने 39 वर्षीय प्रज्ञा मिश्रा यांची ‘सरकारी संबंध प्रमुख’ म्हणून नियुक्ती केली आहे. एका अहवालात ही बाब समोर आली आहे. (ChatGPT’s OpenAI hires Pragya Mishra in India)

मिळालेल्य माहितीनुसार, प्रज्ञा मिश्रा यांनी यापूर्वी Truecaller आणि Meta मध्ये काम केले आहे. या महिन्याच्या अखेरीस त्या OpenAI मध्ये काम सुरू करणार आहेत. मायक्रोसॉफ्ट समर्थित कंपनीने अद्याप नियुक्ती सार्वजनिक केलेली नाही. मात्र अहवालानुसार, प्रज्ञा मिश्रा जुलै 2021 पासून Truecaller च्या सार्वजनिक व्यवहार संचालक म्हणून काम करत आहेत. या स्थितीत त्यांना कंपनीचा अजेंडा पुढे नेण्यासाठी सरकारी मंत्रालये, भागधारक, गुंतवणूकदार आणि मीडिया भागीदार यांच्याशी जवळून काम करावे लागणार आहे. याआधी तिने मेटा प्लॅटफॉर्म्स इंकमध्ये प्रज्ञा मिश्रा यांनी तीन वर्षे काम केले आहे. मेटामध्ये प्रज्ञा यांनी 2018 मध्ये चुकीच्या माहितीच्या विरोधात व्हॉट्सॲपच्या मोहिमेचे नेतृत्व केले होते. याशिवाय नवी दिल्लीतील रॉयल डॅनिश दूतावासातही त्यांनी काम केले आहे.

- Advertisement -

दिल्ली विद्यापीठातून शिक्षण 

प्रज्ञा मिश्रा यांनी 2012 मध्ये इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून एमबीए केले आहे. त्या दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवीधर आहेत. याशिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून त्यांनी बार्गेनिंग आणि निगोशिएशनमध्ये डिप्लोमा देखील केला आहे. प्रज्ञा या एक गोल्फर असून त्यांनी 1998 ते 2007 दरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्या हार्टफुलनेस मेडिटेशन ट्रेनर आहे. तसेच एक पॉडकास्टर आणि 35 हजार फॉलोअर्ससह एक इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएन्सर देखील आहेत.

एआयचे गैरप्रकार रोखण्याचे मोठे आव्हान (Preventing AI abuses is a major challenge)

दरम्यान, प्रज्ञा मिश्रा यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सॅम ऑल्टमनच्या कंपनी ओपनएआयने अशावेळी घेतला आहे, जेव्हा जगभरात डीपफेक व्हिडीओ आणि कृत्रिम तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होताना दिसत आहे. देशात सध्या लोकसभा निवडणुका सुरू असून लोक एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करताना दिसत आहेत. त्यामुळे भारतात एआयचा वापर करून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी एक मजबूत नेतृत्व आवश्यक होते. अशावेळी प्रज्ञा मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -