घरदेश-विदेशHorlicks : हेल्दी ड्रिंक्सच्या श्रेणीतून हॉर्लिक्स बाहेर, हिंदुस्तान युनिलिव्हरची घोषणा

Horlicks : हेल्दी ड्रिंक्सच्या श्रेणीतून हॉर्लिक्स बाहेर, हिंदुस्तान युनिलिव्हरची घोषणा

Subscribe

हिंदुस्थान युनिलिव्हरने हॉर्लिक्स या पेयाला 'निरोगी पेय' म्हणजेच 'हेल्दी ड्रिंक्स' या श्रेणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे यापुढे हॉर्लिक्स हेल्दी ड्रिंक्सच्या श्रेणीत येणार नाही.

नवी दिल्ली : नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने अलीकडेच सांगितले होते की, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 अंतर्गत ‘हेल्थ ड्रिंक्स’ची कोणतीही व्याख्या नाही. FSSAI ने या महिन्याच्या सुरुवातीला ई-कॉमर्स वेबसाइट्सना ‘हेल्थ ड्रिंक्स’ किंवा ‘एनर्जी ड्रिंक्स’ श्रेणीमध्ये डेअरी, धान्य किंवा माल्ट-आधारित पेये सूचीबद्ध करू नयेत असे सांगितले होते. ज्यानंतर याबाबत आता हिंदुस्तान युनिलिव्हरने हॉर्लिक्स या पेयाला ‘निरोगी पेय’ म्हणजेच ‘हेल्दी ड्रिंक्स’ या श्रेणीतून बाहेर काढले आहे. (Horlicks is not healthy drink hindustan unilever changed name)

हिंदुस्तान युनिलिव्हरने त्यांच्या ‘हेल्थ फूड ड्रिंक्स’ श्रेणीचे नामकरण फंक्शनल न्यूट्रिशनल ड्रिंक्स (FND) केले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ई-कॉमर्स वेबसाइट्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील ‘हेल्दी ड्रिंक्स’ श्रेणीतील पेये आणि शीतपेये काढून टाकण्यास सांगितल्यानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे. या बातमीनंतर हिंदुस्थान युनिलिव्हर 1.63 टक्क्यांनी घसरून 2222.35 रुपयांवर आला आहे. सेन्सेक्सवरील टॉप लूजर्सच्या यादीत ते दुसऱ्या स्थानावर आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Money Saving- पालकांनो मुलांना द्या बचतीचे धडे

हिंदुस्तान युनिलिव्हरचे मुख्य आर्थिक अधिकारी रितेश तिवारी यांनी 24 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही श्रेणीचे नाव बदलून FND केले आहे. एफएनडी श्रेणीचा प्रवेश कमी आहे आणि त्यामुळे वाढीसाठी मोठी संधी आहे.” असे त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

- Advertisement -

तसेच, हिंदुस्तान युनिलिव्हरला आपली ग्राहकसंख्या वाढवणे, वापर वाढवणे आणि FND श्रेणीमध्ये अपग्रेड करण्यासाठी ग्राहकांना अधिक फायदे देण्यावर भर देणार आहे. तर, कंपनी प्रीमियम एफएनडी श्रेणीमध्ये चांगली वाढ होताना पाहण्यासाठी इच्छुक आणि उत्सुक आहे. कंपनीने म्हटले आहे की हॉर्लिक्सने आर्थिक वर्ष 2024 मध्ये मार्केट शेअरमध्ये वाढ केली आहे, अशी माहिती देखील तिवारी यांच्याकडून देण्यात आली होती.

हेल्थ ड्रिंक्सची भारताच्या खाद्य कायद्यांमध्ये व्याख्या नाही. FSSAI ने असा युक्तिवाद केला की, कायद्यांतर्गत ‘एनर्जी ड्रिंक्स’ हे फक्त साध्या पाण्यावर आधारित पेय आहे. FSSAI ने म्हटले आहे की, चुकीच्या शब्दांचा वापर केल्याने ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते आणि म्हणून त्यांनी वेबसाइट्सना जाहिराती काढून टाकण्यास किंवा दुरुस्त करण्यास सांगितले आहे. इंडस्ट्री मार्केट रिसर्च आणि सल्लागार फर्म Technavio च्या मते, 2021 ते 2026 पर्यंत भारतातील हेल्दी ड्रिंक्सची बाजारातील टक्केवारी $3.84 अब्जने वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… स्किन ग्लोइंगसाठी प्या या फळाचा ज्यूस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -