घरताज्या घडामोडीपुण्यातील मुलगा प्रेयसीला भेटायला पाकिस्तानला; पण निघालं ISI कनेक्शन; वाचा नेमकं प्रकरण...

पुण्यातील मुलगा प्रेयसीला भेटायला पाकिस्तानला; पण निघालं ISI कनेक्शन; वाचा नेमकं प्रकरण काय?

Subscribe

पुण्यातील एका विद्यार्थ्याने इंटरनेट चॅटींगच्या नादात ISI कनेक्शन असलेल्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशाल (२५) असे या मुलाचे नाव आहे. ही घटना ८ एप्रिल २००७ सालातील आहे. याप्रकरणी ८ एप्रिल २००७ रोजी पुणे शहर पोलिसांनी विशाल नामक २५ वर्षीय तरुणास अटक केली.

पुण्यातील एका विद्यार्थ्याने इंटरनेट चॅटींगच्या नादात ISI कनेक्शन असलेल्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशाल (२५) असे या मुलाचे नाव आहे. ही घटना ८ एप्रिल २००७ सालातील आहे. याप्रकरणी ८ एप्रिल २००७ रोजी पुणे शहर पोलिसांनी विशाल नामक २५ वर्षीय तरुणास अटक केली. पुण्यातील विविध लष्करी इमारती, धार्मिक स्थळे व इतर ठिकाणांचे फोटो व काही माहिती तो पाकिस्तानला पाठवणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

झारखंडमध्ये राहणारा विशाल २००४ साली पुण्यात शिक्षणासाठी आला होता. पुण्यातील एका कॉलेजला त्याने प्रवेश घेतला होता. त्यावेळी विशाल याला इंटरनेट चॅटींगचा नाद लागला. २००५ दरम्यान एका ‘चॅटरूम’मध्ये त्याची ओळख फातिमा नामक सुंदर पाकिस्तानी युवतीसोबत झाली. फातिमा असे त्या युवतीचे नाव होते. या फातिमाने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आपला फोन नंबर दिला. त्यावेळी हडपसर भागातील एसटीडी बूथ वरून विशाल या पाकिस्तानी नंबरवर वारंवार फोन करून फातिमासोबत बोलायचा. त्याचे फोनचे बिल तब्बल दीड लाख रुपये झाले होते. दरम्यान, फातिमाने तिचे वडील सलाहुद्दीन माजी लष्करी अधिकारी असल्याचे सांगितले होते. पोलीस तपासात सलाहुद्दीन पाकिस्तानच्या ‘ISI’ गुप्तहेर संघटनेशी संबंधित असल्याचे समजले. विशालने फोनवर फातिमाच्या आई वडिलांशीही बोलणे केले. धर्मांतर करून इस्लाम स्वीकारल्यास फातिमाशी लग्न लावून देण्याचे आश्वासन त्यांनी विशालला दिले.

याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी विशाल नामक २५ वर्षीय तरुणास अटक केली. पुण्यातील विविध लष्करी इमारती, धार्मिक स्थळे व इतर ठिकाणांचे फोटो व काही माहिती तो पाकिस्तानला पाठवणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. विशालच्या विरोधात क्राइम ब्रांचचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. क्राइम ब्रांचचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे गुन्ह्याचे तपास अधिकारी होते. पोलीस तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक होती.

- Advertisement -

दरम्यान विशालने पुण्यातील लष्करी संस्थांच्या इमारती, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ‘मोतीबाग’ कार्यालय याचे फोटो जमवले आणि इतर महत्वाची माहिती मिळवली. ही माहिती ‘सीडी’मधून तो पाकिस्तानला पाठविणार होता. पण त्याआधीच त्याला अटक करण्यात आली. त्याच्या कडून सदर फोटो असलेली सीडी, सलाउद्दीनचे नाव, पत्ता असलेले पत्रपाकिट, अन्य काही कागदपत्रे, फातिमाचे फोटो इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.

या गुन्ह्यात फातिमा, तिचे वडील सलाहुद्दीन, तसेच दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनचे दोन पाकिस्तानी अधीकारी सईद तिरमीझी आणि अब्दुल लतीफ यानाही षड्यंत्रकारी म्हणून आरोपी करण्यात आले. व्हिएना कन्व्हेन्शनच्या नियम-तरतुदीं मुळे या दोघांवर कारवाई करता आली नाही. विशालने न्यायालयात आपल्यावरील आरोप फेटाळले. पाकिस्तानला केवळ फातिमावर प्रेम असल्याने गेल्याचे त्याने सांगितले. मात्र पुरावे पाहता विशालने गुन्हा केल्याचे न्यायालयाने म्हटले. मार्च २०११ मध्ये न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी विशालला भरतोय दंड संविधान कलम १२० ब तसेच ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट अंतर्गत दोषी ठरवून ७ वर्ष तुरंगवासाची शिक्षा ठोठावली. शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याला मुक्त करण्यात आले.


हेही वाचा – संभाजीराजे छत्रपतींनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; राज्यात नव्या समिकरणांची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -