घरअर्थजगतअॅक्सिस बँकेतील मुदत ठेवींवरचे व्याजदर बदलले, पटापट तपासा

अॅक्सिस बँकेतील मुदत ठेवींवरचे व्याजदर बदलले, पटापट तपासा

Subscribe

अ‍ॅक्सिस बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्‍या कालावधीच्‍या विविध मुदतींमध्ये मुदत ठेवी ऑफर करते. अॅक्सिस बँकेच्या वेबसाईटनुसार, बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 2.50 टक्के व्याजदर देत आहे. 30 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींसाठी 3 टक्के व्याजदर देत आहे,

नवी दिल्लीः Axis Bank FD Rates: बँकेत एफडी काढणं हे सुरक्षित समजलं जातं. अनेक ग्राहकांची गुंतवणुकीसाठी पहिली पसंती ही एफडी असते. एफडीतील पैसेदेखील वेगानं दुप्पट होतात. तसेच वेगवेगळ्या बँकांचे एफडीवर वेगवेगळे व्याजदर असतात. तुमचे खाते खासगी क्षेत्रातील Axis बँकेत असल्यास तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅक्सिस बँकेने मुदत ठेवींचे व्याजदरही वाढवलेत. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी हे बदल करण्यात आलेत. FD वर Axis बँकेचे वाढलेले दर 20 जानेवारी 2022 पासून लागू आहेत. बँकेने ठराविक कालावधीसाठीच व्याजदर वाढवलेत. अलीकडे एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेनेही एफडी व्याजदर वाढवलेत.

अ‍ॅक्सिस बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्‍या कालावधीच्‍या विविध मुदतींमध्ये मुदत ठेवी ऑफर करते. अॅक्सिस बँकेच्या वेबसाईटनुसार, बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 2.50 टक्के व्याजदर देत आहे. 30 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींसाठी 3 टक्के व्याजदर देत आहे, तर 3 महिने आणि 6 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी 3.5 टक्के व्याजदर आहे.

- Advertisement -

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

ऍक्सिस बँकेनेही ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदरात बदल जाहीर केलेत. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 2.5 ते 6.50 टक्के व्याजदर मिळेल.

आयसीआयसीआय बँकेनेही एफडीचे दर बदलले

खासगी क्षेत्रातील ICICI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर बँक दर वाढवण्याची घोषणा केलीय. बँकेचे नवीन दर गुरुवारपासून (20 जानेवारी 2022) लागू झालेत. बँकेच्या वेबसाईटनुसार, बँक आता 7 ते 29 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 2.50 टक्के आणि 30 ते 90 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 3 टक्के व्याजदर देत आहे. हे 91 दिवस ते 184 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी 3.5 टक्के आणि 185 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 4.40 टक्के व्याजदर देत आहे. बँक एक वर्ष ते 389 दिवसांच्या एफडीवर 5 टक्के दर देत आहे.

- Advertisement -

Check interest rates on term deposits at Axis Bank check carefully


हेही वाचाः मेडिकलवाल्यांना नोटा मोजायला वेळ कसा मिळतो?, अजितदादांनी कोरोना टेस्ट कीटवरुन फटकारलं

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -