घरमहाराष्ट्रमाझगावमधील वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

माझगावमधील वीर शिरोमणी महाराणा प्रताप पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Subscribe

माझगाव प्रभाग क्रमांक २०९ येथे वीर शिरोमणी व महान योद्धा महाराणा प्रताप चौक अस्तित्वात आहे. मात्र त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पराक्रमी, विराचा, योद्ध्याचा पुतळा नव्हता. ही बाब यशवंत जाधव यांना खटकत होती. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक भारतीय योद्ध्यासाठी प्रेरणेदायी ठरणारा वीर शिरोमणी व महान योद्धा महाराणा प्रताप यांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प सोडला.

मुंबई : तेजाभिमानी राजा म्हणून इतिहासात अजरामर नोंद झालेले महाराणा प्रताप यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्यातून प्रेरणा मिळविण्यासाठी माझगाव येथील महाराणा प्रताप चौकात शिवसेना उपनेते व मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या संकल्पनेतून महाराणा प्रताप अश्वारुढ भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता महाराणा प्रताप अश्वारुढ भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

याप्रसंगी, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, पर्यावरण, पर्यटन तसेच राजशिष्टाचार मंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खा. अरविंद सावंत, स्थानिक आमदार यामिनी यशवंत जाधव, आ. सुनील शिंदे, आ. राजहंस सिंह, सभागृह नेता विशाखा राऊत, विरोधी पक्षनेता रवी राजा, स्थायी समिती अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक यशवंत जाधव, ‘ई’ प्रभाग समिती अध्यक्ष रमाकांत रहाटे, महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

कोविड नियमांचे पालन करून होणार कार्यक्रम

कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती लक्षात घेता, आवश्यक त्या सर्व निर्देशांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती यशवंत जाधव यांनी दिली.

२० फूट उंच चौथऱ्यावर १६ फूट उंचीचा साडेचार टन वजनी कांस्य धातूचा पुतळा

माझगाव प्रभाग क्रमांक २०९ येथे वीर शिरोमणी व महान योद्धा महाराणा प्रताप चौक अस्तित्वात आहे. मात्र त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या पराक्रमी, विराचा, योद्ध्याचा पुतळा नव्हता. ही बाब यशवंत जाधव यांना खटकत होती. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक भारतीय योद्ध्यासाठी प्रेरणेदायी ठरणारा वीर शिरोमणी व महान योद्धा महाराणा प्रताप यांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प सोडला.

- Advertisement -

महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासाठी तब्बल तीन वर्षे यशवंत जाधव यांनी विविध परवानग्या मिळविणे, पुतळ्यासाठी मान्यता घेणे, पुतळा सुंदर व भव्यदिव्य बनविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. स्थानिक आमदार व यशवंत जाधव यांच्या अर्धांगिनी डॅशिंग आमदार यामिनी जाधव यांची त्यांना मोलाची साथ लाभली. महाराणा प्रताप यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी यशवंत जाधव यांनी २३ एप्रिल २०१८ रोजी संबंधितांची बैठक घेऊन महाराणा प्रताप चौकाचे सुशोभिकरण व महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. महाराणा प्रताप चौकाचे सुशोभिकरण आणि त्यांचा पुतळा स्थापित करण्याच्या प्रस्तावाला ५ मार्च २०१९ रोजी मंजुरी मिळाली. धुळे येथील शिल्पकार सरमद शरद पाटील यांनी महाराणा प्रताप यांचा २० फूट उंच चौथऱ्यावर १६ फूट उंचीचा साडेचार टन वजनी कांस्य धातूचा भालाधारी व अश्वारूढ पुतळा साकारला. ८ ऑगस्ट २०१९ रोजी हा पुतळा मुंबईत आणण्यात आला.

तसेच महाराणा प्रताप चौकात नावीन्यपूर्ण पद्धतीने सुशोभीकरण व विद्युत रोषणाईचे काम करण्यात आले आहे.
येथील वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असताना बेस्ट बसस्थानकाजवळील एका बेटावर जुने कारंजे आढळून आले. त्याचा जीर्णोद्धार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित विविध भित्तीशिल्प आजूबाजूच्या त्रिकोणी बेटांवर लावण्यात आले आहेत. तसेच चौक परिसरातील रस्ते सुधारणा देखील करण्यात आली आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -