घरदेश-विदेशछत्तीसगडच्या धमतरी गावात चकमक; सीआरपीएफचे दोन जवान जखमी

छत्तीसगडच्या धमतरी गावात चकमक; सीआरपीएफचे दोन जवान जखमी

Subscribe

छत्तीसगडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच असून छत्तीसगडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक घडून आली आहे. छत्तीसगडच्या धमतरी गावात शुक्रवारी सकाळी नक्षलवाद्यांच्या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर गुरुवारी कांकेर भारात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत बीएसएफचे चार जवान शहीद झाले होते तर दोन जवान जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

चकमकीत चार जवान शहीद

छत्तीसगड येथील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर सुरु असलेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार सकाळ पासून चकमक सुरु झाली होती. परतापूर ठाणे क्षेत्राच्या अंतर्गत महला गावात ही चकमक सुरु होती. या चकमकीत ११४ वीं बटालियनचे चार जवान शहीद झाले होते तर इतर जवान देखील जखमी झाली होते. बीएसएफचे जवान गश्तीवर असताना हा हल्ला करण्यात आला होता. जवान काही अंतरावर असतानाच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला असून या चकमकीत काही गोळ्या जवांनाना लागल्या असून जवांनानी देखील या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आहे.


वाचा – जम्मू-काश्मीर : दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा – गुप्तचर संस्था

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -