घरदेश-विदेशभारताचे सरन्यायाधीश उदय लळित आज होणार सेवानिवृत्त

भारताचे सरन्यायाधीश उदय लळित आज होणार सेवानिवृत्त

Subscribe

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश उदय लळित उद्या (8 नोव्हेंबर) निवृत्त होत आहेत. मात्र, 8 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असल्याने न्यायालयाला सुट्टी असेल. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश लळित यांचा कामकाजाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातर्फे आज सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील औपचारिक सेरेमोनियल बेंचच्या कार्यवाहीचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोन वाजल्यानंतर सेरेमोनिअल बेंचची कार्यवाही सुरू होईल. त्यात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी सहभागी होतील. सेरेमोनियल बेंचमध्ये भारताचे सरन्यायाधीश हे आपल्या उत्तराधिकारीसह खंडपीठ सामायिक करतात. यावेळी बारचे इतर सदस्य आणि इतर अधिकाऱी त्यांचा निरोप घेतात.

- Advertisement -

महत्त्वाच्या प्रकरणांवर आज सुनावणी
कामकाजाच्या आपल्या अखेरच्या दिवशी न्यायमूर्ती उदय लळित सहा महत्त्वाच्या प्रकरणांवर निकाल देणार आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे प्रकरण म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) 10 टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा. या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तथापि, आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला आहे. 103व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ही करण्यात आलेली आरक्षणाची तरतूद वैध असल्याचे सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय पीठाने म्हटले आहे. घटनापीठाने हा निकाल दिला आहे. पाचपैकी तीन न्यायमूर्तींची सहमती होती तर दोन न्यायमूर्तीं असहमत होते.

- Advertisement -

दुसरे प्रकरण आम्रपाली गृहनिर्माण योजनेशी संबंधित आहे. यामध्ये लाभधारकांना फ्लॅट मिळवून देणे किंवा त्या बदल्यात पैसे मिळवणे यावर सर्वोच्च न्यायालय मोठा निर्णय देणार आहे. इतर चार प्रकरणे सर्वसाधारण आहेत.

27 ऑगस्टला स्वीकारला होता पदभार
महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायाधीश उदय लळीत यांनी 27 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या 49वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाले होते. सरन्यायाधीश उदय लळित यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षा कमी होता.

हेही वाचा – खोटा इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरेंनी सुरू केली; राष्ट्रवादीचा संभाजीराजे छत्रपतींना पाठींबा

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -