घरदेश-विदेशलहान मुलांना नाकाद्वारे देण्यात येणारी भारतीय लस ठरतेय 'गेम चेंजर'- WHO वैज्ञानिक

लहान मुलांना नाकाद्वारे देण्यात येणारी भारतीय लस ठरतेय ‘गेम चेंजर’- WHO वैज्ञानिक

Subscribe

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असून दिवसेंदिवस हा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या मते, भारतात तयार केलेली नाकाद्वारे देण्यात येणारी कोरोनाची लस मुलांसाठी गेम चेंजर असल्याचे सिद्ध होऊ शकते. मात्र अद्याप ही लस उपलब्ध नसली तरी स्वामीनाथन यांचा असा विश्वास आहे की भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आणि मुलांवर होणारा परिणाम लक्षात घेता ही लस येत्या काळात खूप प्रभावी ठरू शकते.

लहान मुलांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी नाकाद्वारे देण्यात येणारी भारतीय लस ही गेम चेंजर असल्याचे सिद्ध होऊ शकते. ही लस लहान मुलांना सहजपणे दिली जाऊ शकते आणि फुफ्फुसांना चांगली प्रतिकारशक्ती देखील प्रदान करते, असे लहान मुलांचे डॉक्टर असणाऱ्या स्वामीनाथन म्हणाल्या. यासह ते असेही म्हणाले की, मला आशा आहे की लवकरच भारतात लहान मुलांसाठी लस उपलब्ध होईल. मात्र यंदा लस मिळेल अशी शक्यता नाही.

- Advertisement -

त्याचबरोबर सौम्या स्वामीनाथन यांनी असेही म्हटले की, जोपर्यंत ही लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत अधिकाधिक प्रौढ, विशेषत: शिक्षकांना कोरोनाची लस देण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरुन शाळा सुरू झाल्यावर, सामुहिक कोरोनाचे संसर्ग रोखण्यास मदत होईल. शाळा उघडण्यापूर्वी आपल्याला सामुहिक संसर्ग होण्याची शक्यता पूर्णपणे काढून टाकावी लागेल. जर आपण देशातील सर्व शिक्षकांना लस दिली तर ते या दिशेने एक मोठे पाऊल ठरू शकते.

 

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -