घरदेश-विदेशचीनमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात; ३६ जण ठार

चीनमध्ये ट्रक आणि बसचा भीषण अपघात; ३६ जण ठार

Subscribe

पूर्व चीनमध्ये काल, शनिवारी सकाळी ट्रक आणि बस यांची टक्कर होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात जवळपास ३६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. चीनमधील स्थानिक सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआ यांनी याबाबत माहिती दिली आहे. भरधाव येणाऱ्या बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातातच ३६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३६ जण जवळपास जखमी आहेत. या बसमधून ६९ प्रवासी प्रवास करत होते.

- Advertisement -

ही दुर्घटना चीनच्या पूर्वेकडील जिआंगसू प्रांतात घडली. भरधाव गाडीचा टायर पंक्चर झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. चीनमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अशा प्रकारचे भीषण अपघात नेहमीच घडत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -