घरदेश-विदेशचिनची घुसखोरी, पंतप्रधान कुठे आहेत?; राहुल गांधींचा सवाल

चिनची घुसखोरी, पंतप्रधान कुठे आहेत?; राहुल गांधींचा सवाल

Subscribe

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विट करून मोदी सरकारला लक्ष्य केला आहे. चीनने लडाखमधील आमच्या भूमीवर कब्जा केला आहे आणि पंतप्रधान गप्प आहेत, असं राहुल गांधींनी ट्विट करत म्हटलं आहे.

राहुल गांधींनी बुधवारी ट्विट करत म्हटलं की, चिनीने लडाखमधील आमचा प्रदेश ताब्यात घेतला, पण पंतप्रधान गप्प आहेत आणि संपूर्ण प्रकरणातून गायब आहेत. यापूर्वी राहुल गांधी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लडाखमधील भारतीय भूमी चिनी सैनिकांनी ताब्यात घेतली आहे का? असा सवाल केला होता.

- Advertisement -

rahul gandhi tweet

आज भारत-चीन सैन्यात मेजर जनरल पातळीवर चर्चा होणार आहे. पूर्व लडाखमधील एलएसीवर तीन ठिकाणांवरून चीनी सैन्य मागे गेल्यानंतर हा वाद पूर्णपणे संपवण्यासाठी भारत आणि चीन लष्कराची मेजर जनरल पातळीवर बुधवारी पुन्हा चर्चा होणार आहे. भारत-चीनमधील तणाव किती प्रमाणात कमी होईल हे या बैठकीत निश्चित होईल. अशा परिस्थितीत या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारत-चीन सीमावादावरुन सध्या दोन्ही देशात वातावरण तापलं आहे. याआधी भारत आणि चीन यांच्यात ६ जून रोजी चुशूल येथे लेफ्टनंट जनरल पातळीवर चर्चा झाली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -