घरदेश-विदेशधक्कादायक! चीनने नष्ट केले करोनाचे नमुने

धक्कादायक! चीनने नष्ट केले करोनाचे नमुने

Subscribe

अमेरिकेचा दावा खरा ठरला

चीनने करोनाचे नमुने नष्ट केल्याची कबुली दिली आहे. चीनने आपण अनधिकृत प्रयोगशाळांना करोनाचे नमूने नष्ट करण्याचा आदेश दिला होता अशी माहिती दिली आहे, पण यावेळी त्यांनी जैविक सुरक्षेच्या हेतून हे नमूने नष्ट करण्यात आल्याचा दावा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे चीनने दिलेल्या या कबुलीमुळे अमेरिकेकडून करण्यात आलेला दावा खरा ठरला आहे. न्यूजवीकने यासंबंधी वृत्त दिले आहे.

चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ्य आयोगाचे निरीक्षक यू डेंगफेंग यांनी हा खुलासा केला आहे. यू डेंगफेंग यांनी यावेळी इतर देशांपासून करोनाची माहिती लपवण्याच्या हेतून हे नमूने नष्ट करण्यात आले नसून, जैविक सुरक्षेच्या हेतूनेच निर्णय घेण्यात आल्याचंही सांगितलं. करोनाचं पहिलं प्रकरण समोर आल्यापासून राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ त्यावर लक्ष ठेवून यामागील कारणांचा शोध घेत होते, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

- Advertisement -

बिजिंग येथे पत्रकारांना माहिती देताना यू डेंगफेंग यांनी सांगितले की, करोना रुग्णाचे नमूने नष्ट करण्यात आले. जैविक प्रयोगशाळांच्या सुरक्षेसाठी तसेच या अज्ञात रोगापासून अन्य कोणता धोका निर्माण होऊ नये यासाठी हे नमूने नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक स्वास्थ्य कायद्यांतर्गत हे नमूने नष्ट करण्यात आले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी चीन करोनाचा फैलाव सुरू झाल्याच्या सुरुवातीच्या दिवसांमधील म्हणजेच डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेला करोना रुग्णांची नमूने देण्यास नकार देत असल्याचं म्हटले होते. सोबतच चीनने हे नमूने नष्ट केले असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता चीनकडून ही कबुली देण्यात आली आहे.

चीनी कम्युनिस्ट पक्षाने करोनाचा किती फैलाव झाला आहे याची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला. कशा पद्दतीने त्याचा फैलाव होत आहे याची माहितीही दिली नाही. जागतिक आरोग्य संघटनेपासूनही माहिती लपवण्यात आली. यावेळी त्यांनी करोनासंबंधी तसेच रुग्णसंख्येची योग्य माहिती न दिल्याचाही आरोप केला होता. सोबतच चीनने करोनाचे नमुने नष्ट केल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी चीनवर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -