घरदेश-विदेशमध्य प्रदेशात काँग्रेसचे 'कमल'नाथ मुख्यमंत्री

मध्य प्रदेशात काँग्रेसचे ‘कमल’नाथ मुख्यमंत्री

Subscribe

तीन दिवसांपूर्वी देशाला आश्चर्यचकित करणारे निकाल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतून दिसले. काँग्रेसने तीन राज्यांमध्ये बहुमत मिळवले. मात्र त्या राज्यांचा कारभारी कोण असणार? यावर बराच खल झाला. यापैकी एका राज्याचा तिढा सुटला असून मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसने जुने-जाणते आणि ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या नावाची घोषणा केली आहे.

- Advertisement -

काल रात्री काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंबंधी एक ट्विट करण्यात आले आहे. तीनही राज्यांमध्ये नवे नेतृत्व आणि अनुभवी नेतृत्व असा वाद उभार राहिला होता. शेवटी राहुल गांधी यांनी संबंधित नेत्यांची दिल्ली येथे बोलावून त्यांच्यात समेट घडवून आणला. मध्य प्रदेशच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ज्योतिरादित्य सिंधिया यांची मनधरणी करण्यात काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना यश आल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेशला उपमुख्यमंत्री नसेल असे सांगून राज्याला दुसरे पॉवर सेंटर नसेल, हे ही काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

ज्योतिरादित्य यांची माघार

मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे तरुण नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर माघार घेतली आहे. त्यानंतर त्यांनीही ट्विट करुन आपली भूमिका मांडली. “ही काही शर्यत किंवा खुर्ची मिळवण्यासाठीची स्पर्धा नाही. आम्ही मध्य प्रदेशच्या जनतेच्या सेवेसाठी आहोत.”

- Advertisement -

राहुल गांधी यांनी उभय नेत्यांमध्ये समेट घडवून आणल्यानंतर लिओ टॉलस्टॉय यांचे प्रसिद्ध वाक्य लिहून एक फोटो ट्विट केला आहे. या ट्विटला आतापर्यंत पन्नास हजार लोकांनी लाईक केले आहे. त्यात राहुल गांधी म्हणतायत की, “दोन जबरदस्त योद्ध्यांमध्ये वेळ आणि सबुरी आहे.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -