घरदेश-विदेशकरिना कपूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार?

करिना कपूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार?

Subscribe

अभिनेत्री करिना कपूर काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करिनाचा तरुण चाहता वर्ग मोठा असल्याने त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, असे गणित काँग्रेसचे आहे.

अभिनेत्री करिना कपूरला काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भोपाळ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी काँग्रेस ही शक्कल लढवित आहे. करिना कपूर तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असल्यामुळे भोपाळ मतदारसंघ जिंकणं सोपं होईल, असं काँग्रेसचं राजकीय गणित आहे. काँग्रेस सध्या लोकसभा निवडणुकीची चांगलीच तयारी करत आहे.

हेही वाचा – माधुरी दीक्षित पुण्यातून निवडणूक लढविणार?

- Advertisement -

करिनाचा फायदा काँग्रेसला; नगरसेवकांचा दावा

करिना कपूर ही भोपाळच्या पतौडी घराण्याची सून आहे. करिनाचा पती सैफ अली खान याचं भोपाळशी घनिष्ठ असं नातं आहे. अनेक वर्षांपासून पतौडी कुटुंब भोपाळमध्ये वास्तव्यास आहे. शिवाय, करिना तरुणांमध्ये लोकप्रिय आहे, त्यामुळे पतौडी कुटुंबाचा फायदा येत्या लोकसभा निवडणुकीसाठी करुन घ्यावा, असा सल्ला काँग्रेसचे नगरसेवक गुड्डू चौहान आणि अनीस खान यांनी दिला आहे. यासंबंधी माहिती ‘इंडिया टुडे’ने दिली आहे.

हेही वाचा – जान्हवी कपूरने जेव्हा स्मृती इराणींना म्हटलं ‘आंटी’

- Advertisement -

काँग्रेस लोकसभेच्या तयारीला

काँग्रेस २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जाहीरनामा बनवत आहे. या जाहीरनाम्यात शेतकरी आणि रोजगार संबंधित महत्त्वाच्या योजना असल्याचे बोलले जात आहे. या जाहीरनाम्यासाठी राहुल गांधींनी तज्ज्ञ व्यक्तींची भेट घेतली आहे. भाजप सरकारला पाडण्यासाठी काँग्रेस वेगवेगळ्या शक्कल लढवित आहे. आता याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी काँग्रेस करिना कपूरला उमेदवारी देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – स्मृती इराणीलाही दीपवीरच्या लग्नाच्या फोटोची उत्सुकता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -