घरमनोरंजनजान्हवी कपूरने जेव्हा स्मृती इराणींना म्हटलं 'आंटी'

जान्हवी कपूरने जेव्हा स्मृती इराणींना म्हटलं ‘आंटी’

Subscribe

एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री आणि कलाकार स्मृती इराणींना अभिनेत्री जान्हवी कपूर यांनी आंटी म्हणून संबोधले. त्यावेळी मला कोणी गोळी का नाही मारत? अशा प्रकारची कमेंट स्मृती इराणींने केली आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून त्यांनी ही माहिती दिली.

जेव्हा नवीन पिठीतील कलाकार जेष्ठ कलाकारांना भेटतात तेव्हा काय होते? याचे एक उदाहरण नुकतेच बघायला मिळाले. ज्यावेळी कलाकारांना आपल्या वयाची जाणीव नसते आणि इतर कलाकार ती जाणीवर करुन देतात अशा वेळी खूप लाजवाटते अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि कलाकार स्मृती इराणी यांनी दिली आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात कालवश अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर इराणी यांना भेटली होती. यावेळी जान्हवीने स्मृतीला ‘आंटी’ म्हणून संबोधले. आपल्याला आंटी म्हटल्यावर स्मृती इराणींना आश्चर्याचा धक्काच बसला. इराणींनीही ‘जान्हवीला कोई बात नही बेटा’ असे प्रत्योत्तर दिले. या घटनेची माहिती इराणी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर टाकली आहे. आतापर्यंत २७ हजार हून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.

काय लिहिले इराणींनी

“कोणी तरी मला गोळी मारावी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. ज्यावेळी माझी प्रिय जान्हवी कपूर मला आंटी म्हणून बोलवते. ‘कोई बात नही बेटा’ अशी प्रतिक्रिया माझ्याकडून देण्यात आली. ही आज कालची पोर पण ना!!!” – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -