घरताज्या घडामोडीमोदी सरकार हे देशातील कमजोर सरकार, काँग्रेसचे टीकास्त्र

मोदी सरकार हे देशातील कमजोर सरकार, काँग्रेसचे टीकास्त्र

Subscribe

सात वर्षांतील मोदी सरकारची सर्व काम समोर आली आहेत. आता त्यांची उत्तरे देण्याची वेळ आली

देशात मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली (Modi Govt 7th anniversary) गेल्या सात वर्षात देशात प्रचंड महागाईने लोक ग्रासले आहेत. देशात पेट्रोलच्या किंमती शंभरीपार तर तेलाच्या किंमती २०० रुपयांच्या पार गेल्या आहेत. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिंलेडच्या किंमतींनी घरातील गृहिणींचे बजेट कोलमडले. गेल्या सात वर्षांपासून देश हे सहन करत आहे. मोदी सरकार हे देशातील सर्वात कमजोर सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे. सात वर्षांतील मोदी सरकारची सर्व काम समोर आली आहेत. आता त्यांची उत्तरे देण्याची वेळ आली असल्याचे म्हणत काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडले आहे. (Congress Leader randeep singh surjevala slam modi government)

मोदी सरकार देशातील शेतकऱ्याचे पिक हिसकावून घेत आहे. तीन काळे कृषी कायदे शेकऱ्यांवर लादून त्यांच्यावर अन्याय करत असल्याचे ही सुरजेवाल यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने गेल्या सात वर्षात गरिबीवर नाही तर गरिबांवर वार केला आहे. गेल्या सात वर्षांपासून देशात २३ करोड भारतीय दारिद्र रेषेखाली आहे. तर सव्वा तीन करोड भारतीय मध्यम वर्गीय श्रेणीतून बाहेर गेले आहेत. गेल्या सात वर्षांपासून भारतातील जनता हे सहन आहे, अशी टीका सुरजेवाल यांनी केली.

- Advertisement -

त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात लाखो जण तडफडून तडफडून आपला जीव गमावत आहे. स्मशानभूमी आणि कबरीस्थानात मृतदेहांची विल्हेवाट लावायला जागा राहिलेली नाही. मोदी सरकारच्या काळात कोरोची महामारीची भयंकर परिस्थिती असताना ऑक्सिजन,व्हेंटिलेट,रुग्णालय, औषधे कोरोना प्रतिबंधात्मक लस या सगळ्यांचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकार पूर्णपणे गप्प बसलेले आहे. मोदी सरकार चीन सारख्या देशाचेही काही करु शकलेले नाही. भारतीय सीमा भागात चीन करत असलेल्या अतिक्रमणांना मोदी सरकार थांबवू शकले नाही. गेल्या सात वर्षांत मोदी सरकार हे गेल्या ७३ वर्षांतील सर्वात कमजोर सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे,अशी टीका काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.


हेही वाचा – Modi Govt 2.O: कोणताही जल्लोष साजरा न करता लोकांची मदत करण्याचे हायकमांडचे आदेश

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -