घरदेश-विदेशभाजपनंतर आता काँग्रेसच्या नेत्यांची हाणामारी

भाजपनंतर आता काँग्रेसच्या नेत्यांची हाणामारी

Subscribe

भाजपच्या एका खासदाराने त्यांच्याच पक्षाच्या आमदाराला चपलीने मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याप्रकरणानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांमध्येही हाणामारी झाल्याचे उघड झाले आहे.

भाजप आमदार आणि खासदाराच्या मारामारीनंतर आता काँग्रेस नेत्यांच्याही मारामारीची घटना समोर येताना दिसत आहे. उत्तराखंडमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी एकमेकांना मारहाण केल्याती घटना घडली आहे. या बैठकीत काँग्रेसचे मोठमोठे नेते उपस्थित होते. काँग्रेसने माजी खासदार आणि निरिक्षक महिंद्र पाल सिंह यांना या बैठकीसाठी पाठविण्यात आले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार ठरवण्यासाठी उत्तराखंडच्या रुडकी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसकडून महिंद्र पाल सिंह यांना पाठविण्यात आले होते. ही बैठक उत्तराखंडच्या हरिद्वार लोकसभेच्या जागेसाठी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि माजी जिल्हाध्यक्ष डॉ. संजय पालीवाल आले होते. दरम्यान, रावत आणि पालीवाल या दोघांपैकी कोनाला तिकीट द्यायचे, यावरुन दोघांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. उमेदवारीसाठी इच्छूक उमेदवाऱ्यांच्या मुलाखती सुरु होत्या. दरम्यान, खोलीच्या एका बाजुला रावत समर्थक तर दुसऱ्या बाजूला पालीवाल समर्थक उभे होते. ज्या गटाच्या नेत्याला बोलावले जायचे तो गट घोषणाबाजी करायचा. यात पालीवाल यांच्या एका समर्थकाने ‘हरीष रावत मुर्दाबाद’ अशी घोषणा केली आणि वाद उफाळला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, महिंद्र पाल सिंह यांनी मारामारी झाले नसून किरकोळ बाचाबाची झाल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

पाहा – बैठकीतच भाजप खासदाराने आमदाराला चप्पलने चोपले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -