घरदेश-विदेश'केंद्र सरकार लोकशाहीची हत्या करतंय', विरोधकांचं संसदेबाहेर आंदोलन

‘केंद्र सरकार लोकशाहीची हत्या करतंय’, विरोधकांचं संसदेबाहेर आंदोलन

Subscribe

सरकार दररोज लोकशाहीची हत्या करतंय, संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका

संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर गुरुवारी विरोधी पक्षांनी संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात बाराहून अधिक राजकीय पक्ष सहभागी झाले होते. यावेळी पहिल्यांदाच राज्यसभेत खासदारांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी सरकारवर केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राज्यसभेत पहिल्यांदा खासदारांना धक्काबुक्की करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावण्यात आलं आणि खासदारांना धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. सभापतीची जबाबदारी सभागृह चालवण्याची असते. देशाचे पंतप्रधान आज देश विकण्याचे काम करत आहेत, दोन-तीन उद्योगपती देश विकत आहेत. संसदेच्या आत विरोधकांना बोलू दिले जात नाही आहे, असं राहुल गांधी म्हणाले. देशातील ६० टक्के लोकांचा आवाज दाबला जात आहे, राज्यसभेत खासदारांशी गैरवर्तन करण्यात आले. आम्ही सरकारला पेगाससच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास सांगितले, आम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा, महागाई मुद्दा उठवला. पण यावर चर्चा करण्यात आली नाही. ही लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

- Advertisement -

सरकार दररोज लोकशाहीची हत्या करतंय – राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यसभेत शेवटच्या दिवशी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता, असे वाटत होते की आपण पाकिस्तानच्या सीमेवर उभे आहोत. सरकार दररोज लोकशाहीची हत्या करत आहे, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली. आम्ही या सरकारविरोधात लढा देत राहू, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -