घरदेश-विदेशईदच्या दिवशी राहुल गांधी पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर, टॅक्सी चालकांची केली विचारपूस

ईदच्या दिवशी राहुल गांधी पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर, टॅक्सी चालकांची केली विचारपूस

Subscribe

ईदच्या निमित्ताने राहुल गांधी घराबाहेर पडत टॅक्सी चालकांची विचारपूस केली.

कोरोनाचा फटका कामगार आणि श्रमिक वर्गाला बसला आहे. यारुन विरोधी पक्ष केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सतत निशाणा साधत आहे. अलीकडेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रस्त्यावर स्थलांतरित मजुरांना भेट दिली. आता ईदच्या निमित्ताने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी पुन्हा दिल्लीच्या रस्त्यावर उतरले.

ईदच्या निमित्ताने राहुल गांधी घराबाहेर पडत टॅक्सी चालकांची भेट घेतली. यावेळी, राहुल गांधींनी टॅक्सी चालकांच्या समस्यांबद्दल विचारलं. तसंच कोरोना संकट-लॉकडाऊन यावर चर्चा केली. लॉकडाऊनमुळे टॅक्सी-कॅब-ऑटो चालकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. पहिल्या लॉकडाऊमध्ये रहदारी पूर्णपणे बंद होती आणि आता लॉकडाऊच्या चौथ्या टप्प्यात थोडीशी शिथिलता असल्याने एक किंवा दोन प्रवाशांना बसवण्याची परवानगी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचा बँकांना फायदा की तोटा?


या महिन्याच्या सुरुवातीस राहुल गांधींनी सुखदेव विहारजवळ घरी परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधींनी त्याच्या वेदना जाणून घेत लॉकडाऊनमुळे त्यांना किती त्रास झाला यावर चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसने राहुल गांधी आणि स्थलांतरित मजुरांच्या भेटीचा व्हिडिओही शेअर केला होता. ज्यामध्ये राहुल गांधींनी काही मजुरांशी बोलून खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था याबाबत विचारपूस केली. चालण्याचं कारण विचारलं. इतकंच नव्हे तर राहुल गांधींनी मजुरांना घरी सोडण्यासाठी बसची व्यवस्था केली.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -