घरक्राइमनवरा काळा असल्यामुळे सतत केला तिरस्कार; एकेदिवशी पेट्रोल ओतून जाळले जिवंत

नवरा काळा असल्यामुळे सतत केला तिरस्कार; एकेदिवशी पेट्रोल ओतून जाळले जिवंत

Subscribe

लखनऊ : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील कुधफतेहगढ पोलीस स्टेशन हद्दीतील बिचैता काझी गावात घडलेली धक्कादायक जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर समोर आली आहे. संभलच्या काझी गावात नवरा काळा असल्यामुळे पत्नीने तो झोपेत असताना पेट्रोल ओतून 2019 रोजी जिवंत जाळले होते. याप्रकरणी संभलच्या जिल्हा न्यायालयाने आरोपी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तिला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. (Continually hated by husband for being black One day they poured petrol and burnt them alive Uttar Pradesh Sambhal)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला गोरी होती आणि तिचा पती काळा होता. त्यामुळे ती त्याचा तिरस्कार करत होती. याच कारणावरून आरोपी महिलेने 15 एप्रिल 2019 रोजी पती झोपेत असताना त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला जिवंत जाळले होते. मृताच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून आणि पुरावे पाहिल्यानंतर न्यायालयाने आरोपी महिलेला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बस अचानक सुरू होऊन फलाटावर चढली अन् तीन जणांना चिरडून गेली; व्हिडीओ होतोय व्हायरल

काझी गावात राहणाऱ्या मृतकाचा भाऊ हरवीर सिंगने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याने आरोप केला होता की, त्याची वहिनी प्रेमश्री हिने त्याचा मोठा भाऊ सत्यवीरला जाळून मारले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत या प्रकरणाचा तपास करत आरोपी प्रेमश्रीला अटक केली होती. आरोपी महिलेची पोलीस ठाण्यात चौकशी केली असता  पोलीसही आश्चर्यचकित झाले.

- Advertisement -

आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले की, मी गोरी आहे, पण माझा पती काळा आहे. यामुळे मी माझ्या पतीचा तिरस्कार करत होती. या द्वेषामुळे एके दिवशी पती घोंगडी पांघरून झोपला असताना गुपचूप त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. परंतु आग लागल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पतीला रुग्णालयात दाखल केले आणि तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – क्रौर्याची परिसीमा : पत्नीला 17 वेळा चाकूने भोकसले, अंगावरून गाडीही घातली; शेवटी कोर्टाने…

फिर्यादी हरवीरने पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी मी वडिलांसोबत शेतात काम करत होतो. मोठा भाऊ घरी झोपला असल्याने त्याला काही वेळाने आमच्यासाठी चहा घेऊन येण्यास सांगितले होते. मात्र बराच वेळ झाला तरी मोठा भाऊ चहा घेऊन आला नाही, त्यामुळे घरी जाऊन पाहिल्यावर सर्व प्रकार लक्षात आला. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील हरिओम प्रकाश उर्फ ​​हरीश सैनी यांनी सांगितले की, घटनेशी संबंधित सर्व पुरावे आणि साक्षीदार न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने प्रेमश्रीला दोषी ठरवून तिला शिक्षा ठोठावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -