घरदेश-विदेश...आणि त्यांच्यातील बंड मेलेले असते, मोफत रेशन योजनेवरून केंद्रावर आव्हाडांची टीका

…आणि त्यांच्यातील बंड मेलेले असते, मोफत रेशन योजनेवरून केंद्रावर आव्हाडांची टीका

Subscribe

मुंबई : केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या मोफत रेशन योजनेला 5 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली होती. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एका तत्वज्ञानाची टिप्पणीचा दाखला देत या योजनेच्या अनुषंगाने केंद्र सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा – Bharat Jodo Yatra: लवकरच राहुल गांधींची भारत जोडो यात्रा; मात्र यंदा ‘चालणार’ नाहीत

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24चा अर्थसंकल्प मांडताना केंद्राची मोफत रेशन योजना एका वर्षासाठी म्हणजेच 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. आता ते आणखी 5 वर्षांसाठी वाढवण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. ही योजना केंद्र सरकारने 30 जून 2020 रोजी सुरू केली. तेव्हापासून गरजूंना दिलासा देत त्याची मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. आता नव्या घोषणेनंतर देशातील 80 कोटी गरीब लोकांना या योजनेचा लाभ डिसेंबर 2028 पर्यंत मिळणार आहे.

- Advertisement -

यावरून राज्याचे माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला असता; एका थोर तत्वज्ञानाने लिहिलेली काही वाक्यं मला आठवतात, समाजाला जेव्हा राजकारणी लोक दिशा देऊ शकत नाहीत, तेव्हा ते एक प्रयोग करतात समाजाला स्वतःवर अवलंबून ठेवतात, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – तुरुंगातील चांगल्या व्यवस्थेसाठी ‘अतिरेकी’ असणे गरजेचे; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

फुकटचे जेवण, फुकटचे रेशन हा त्यातलाच एक भाग आहे. फुकटचे जेवण आणि फुकटचे रेशन द्या, लोक तुम्हाला नेत्याच्या घराबाहेर बसलेली दिसतील. लोक दिशाहीन असतात, विचारहीन असतात आणि कळपासारखे त्या नेत्याच्या मागे फिरत असतात. लोकशाहीला हा सर्वात मोठा धोका आहे. कारण ते विचाराने षंढ झालेले असतात आणि त्यांच्यातील बंड मेलेले असते, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -