घरदेश-विदेशSushant Case : सुशांतच्या वडिलांचा आरोप; मुंबई पोलीस रियाला वाचवण्याच्या प्रयत्नात

Sushant Case : सुशांतच्या वडिलांचा आरोप; मुंबई पोलीस रियाला वाचवण्याच्या प्रयत्नात

Subscribe

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सुशांतच्या वडिलांनी पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलीस रियाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञा पत्र सादर केले. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात रिया चक्रवर्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला या आशयाचे एक प्रतिज्ञापत्र सुशांतच्या वडिलांनी कोर्टात दाखल केले आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याआधी सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर इतरही आरोप केले होते.

फेब्रुवारी महिन्यातच सुशांतच्या जिवाला धोका आहे, अशी तक्रार मी नोंदवली होती, असा दावा सुशांतच्या वडिलांनी केला होता. मात्र अशी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले. आता या प्रकरणात पुन्हा एकदा पोलिसांवर आरोप करत ते रियाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुशांतच्या वडिलांनी म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

- Advertisement -

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण तपासासाठी केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) यांच्याकडे सोपवण्यात आले असून याप्रकरणी गुरुवारी सीबीआयने याप्रकरणात रिया चक्रवर्ती हिच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केल आहे. आम्ही बिहार पोलिसांच्या संपर्कात आहोत असे सीबीआयचे प्रवक्ते यांनी म्हटले आहे. सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हीच्यासह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या रिया चक्रवर्तीची ईडीतर्फे चौकशी होत असून सोमवारी पुन्हा रियाला ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आले आहे.

हेही वाचा –

चीन काही सुधरेना : भारतात धोकादायक बियाणे पाठवण्याचा चीनचा कट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -