घरताज्या घडामोडीचीन काही सुधरेना : भारतात धोकादायक बियाणे पाठवण्याचा चीनचा कट

चीन काही सुधरेना : भारतात धोकादायक बियाणे पाठवण्याचा चीनचा कट

Subscribe

भारतात धोकादायक बियाणे पाठवण्याचा चीनचा कट असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सध्या सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूने संपूर्ण देशात अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र, असे असताना देखील चीन काही सुधरत नसल्याचे दिसून येत आहे. आता भारतात धोकादायक बियाणे पाठवण्याचा चीनचा कट असल्याचे समोर आले आहे. केंद्राने राज्यांना, उद्योग आणि संशोधन संस्थांना संशयास्पद आणि अनपेक्षित बियाणांच्या पार्सलबाबत सतर्क राहण्याच्या सूनचा दिल्या आहेत. देशाच्या जैवविविधतेसाठी धोकादायक ठरू शकतात असे बियाणे यात असू शकतात, असं इशारा केंद्राने दिला आहे.

हजारो पार्सल जगाच्या अनेक देशांत पाठवले

गेल्या काही महिन्यांत अशा संशयित बियाण्यांचे हजारो पार्सल जगाच्या अनेक देशांत पाठवण्यात आले आहेत. यामध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, न्यूझीलंड, जपान आणि काही युरोपियन देशांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. तसेच ही पार्सल अज्ञात स्त्रोतांकडून पाठवली जात आहेत आणि त्यामध्ये दिशाभूल करणारी लेबल लावली जात असल्याचे कृषी मंत्रालयाने निर्देशात म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान, अमेरिकेच्या कृषी विभागाने चीनच्या या कुरघोडीचे ब्रशिंग घोटाळा आणि कृषी तस्करी असे वर्णन केले आहे. तसेच चीनकडून देण्यात आलेली बियाणे रोगजनक असू शकतात. जे पर्यावरण, शेती आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका दर्शवते, अशी बियाणे पार्सल देशाच्या जैवविविधेतेसाठी धोकादायक ठरु शकतात. म्हणूनच, सर्व राज्यांमधील कृषी विभाग, राज्य कृषी विद्यापीठे, बियाणे संघटना, राज्य बियाणे प्रमाणपत्र संस्था, बियाणे कॉर्पोरेशन आणि भारतीय कृषी संशोधन परिषद आणि त्यांच्या संस्थांना अशा संशयास्पद पार्सलपासून सावध राहण्याचा सल्ला केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिला आहे.

‘बियाण्यांद्वारे साथीचा रोग आला तर ते हाताळणे कठीण होईल. त्यामुळे अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे’, असे कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे हा सर्वांसाठी सध्या सतर्कतेचा इशारा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधानांनी केला आनंद व्यक्त; म्हणाले, १७ हजार कोटींचा निधी साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -