घरदेश-विदेशCorona: देशात २४ तासांत ५०७ जणांचा मृत्यू, १८ हजाराहून अधिक नव्या रूग्णांची...

Corona: देशात २४ तासांत ५०७ जणांचा मृत्यू, १८ हजाराहून अधिक नव्या रूग्णांची नोंद

Subscribe

देशात आतापर्यंत ५ लाख ८५ हजार ४९३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे

भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांची एकूण संख्या सहा लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. देशात कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ५ लाख ८५ हजार ४९३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १७ हजार ४०० लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर ३ लाख ४७ हजार ९७९ लोकं बरे झाले आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांत १८ हजार ६५३ कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद कऱण्यात आली आहेत तर ५०७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सलग सातव्या दिवशी कोविड -१९ चे १५ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या रूग्णांचे रिकव्हरी दर ५९.०७ टक्के आहे. या एकूण रूग्ण संख्येत परदेशी नागरिकांचादेखील सहभाग आहे. १ जूनपासून देशात ३ लाख ७६ हजार ३०५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. आयसीएमआरच्या मते, २९ जूनपर्यंत देशात एकूण ८६ लाख ८ हजार ६५४ जणांची कोरोना टेस्ट झाली होती, त्यापैकी सोमवारी २ लाख १० हजार २९२ जणांची चाचणी घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

कोविड १९ इंडियाने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा विचार करायचा झाला तर, राज्यात आतापर्यंत १ लाख ७४ हजार ७६१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ७५ हजार ९७९ अॅक्टिव्ह रूग्ण असून ९० हजारांहून अधिक रूग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ७ हजार ८५५ जणांना कोरोनाने मृत्यू झाला आहे.


रात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास करोनाबाधितांचे सर्वाधिक मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -